आश्चर्य! पृथ्वीवरील या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही, इथल्या लोकांना अंधारच माहिती नाही, पाहा VIRAL VIDEO | viral video shows how sun never sets in these parts of earth prp 93 | Loksatta

आश्चर्य! पृथ्वीवरील या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही, इथल्या लोकांना अंधारच माहिती नाही, पाहा VIRAL VIDEO

कल्पना करा अशा ठिकाणी पर्यटकांना वेळेचा मागोवा घेणं किती मनोरंजक असेल. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आश्चर्य! पृथ्वीवरील या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही, इथल्या लोकांना अंधारच माहिती नाही, पाहा VIRAL VIDEO
(Photo: Instagram/ _unknowns_universe_ )

दिवस आणि रात्र हे आपल्या नित्यनियमाचे झाले आहेत. १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र हे आपल्या सवयीचं झालं आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्याकारणाने दिवस-रात्रीची ही किमया आपल्याला अनुभवायला मिळते. मात्र, तुम्हाला जर असं म्हटलं की, पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी कधी रात्र होतच नाही. जिथे २४ तास सूर्यप्रकाश असतो आणि सूर्य कधीच मावळत नाही. कल्पना करा अशा ठिकाणी पर्यटकांना वेळेचा मागोवा घेणं किती मनोरंजक असेल. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सूर्य कधीच न मावळण्याच्या या अपूर्व गोष्टीला ‘द मिडनाईट सन’ असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही, असे अनेक ठिकाण सांगणारा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे सूर्य कधी मावळतच नाही, याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. जिथे सूर्य कधी मावळतच नाही त्यांची सकाळ आणि रात्र कशी होत असेल, २४ तास सूर्याच्या प्रकाशात राहण्याचं तिथलं जीवनमान कसं असेल, असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. या व्हिडीओमध्ये दर्शविलेली ही अनोखी नैसर्गिक घटना केवळ पृथ्वीच्या ध्रुवावर घडते. आर्क्टिक खडांच्या उत्तरेस आणि अंटार्क्टिक खंडाच्या दक्षिणेस स्थानिक उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये ही नैसर्गिक घटना घडते. जेव्हा ध्रुववस्थेत सूर्य क्षितिजाच्या खाली राहतो तेव्हा पोलर नाईट नावाची विचित्र घटना घडते.

आणखी वाचा : झोपलेल्या मालकाला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली ही अजब पद्धत; VIRAL VIDEO पाहून आवरणार नाही हसू

unknowns_universe‘ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ लोक फार उत्सुकतेने पाहत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २.४ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला इंटरस्टेलर चित्रपटातील ‘कॉर्नफिल्ड चेस’ या गाण्यामुळे हा व्हिडीओ आणखी इंटरेस्टिंग बनला आहे. ‘मिडनाईट सन’ नक्की कसं घडतं हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलंय.

आणखी वाचा : जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कॅफेमध्ये कपलंच नव्हे तर सापही रोमान्स करतात! विश्वास बसत नसेल तर हा VIRAL VIDEO एकदा पाहा!

नॉर्वे, फिनलँड, स्विडन, अलास्का, कॅनडा, आइसलॅंड या देशात सूर्य कधीच मावळत नाही. नॉर्वे देशाला ‘मिडनाईट सन’चा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. या देशात मेच्या उत्तरार्धापासून ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे सुमारे 76 दिवसांच्या कालावधीत सूर्य सुमारे २० तास मावळत नाही. फिनलँड या देशातील नागरिकांना हिवाळ्यात सूर्यप्रकाश पहायला देखील मिळत नाही. स्विडनमध्ये या देशात निरंतर सूर्यप्रकाशाचा कालावधी वर्षाकाठी सहा महिन्यांपर्यंत असतो. अलास्कामध्ये मे अखेरीस ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत सूर्य मावळत नाही. इनुविक आणि वायव्य प्रदेशांसारख्या ठिकाणी सुमारे 50 दिवस सतत सूर्यप्रकाश पाहणारा कॅनडा हा दुसऱ्या क्रमांकाचा असा देश आहे. हा देश जवळपास वर्षभर बर्फाच्छादित अवस्थेत असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-08-2022 at 15:39 IST
Next Story
Kerala:कौतुकास्पद! मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा