Video Shows Groom Takes Bride Permission To Wear Mangalsutra : एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करून संपूर्ण आयुष्य त्याच्याबरोबर राहणे वाटते तितके सोपे नसते. त्यामुळे मुलींसाठी हा क्षण खूप भावूक असतो. आपल्या कुटुंबाला सोडून दुसऱ्याच्या घराला आपलंस करायचे असते. त्यामुळे अनेकदा मुलींच्या मनात आपण घेतलेला निर्णय योग्य तर आहे ना याची भीती जाणवत असते. पण, जोडीदार समजून घेणारा, प्रत्येक परिस्थितीत आपल्या कम्फर्टेबल करणारा असेल प्रत्येक गोष्ट सोपी वाटू लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये नवऱ्याने भर मांडवात एक खास गोष्ट केली आहे.
व्हायरल व्हिडीओत जोडप्याच्या लग्नाच्या विधी सुरु असतात. यादरम्यान पंडित नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगतात. लग्न मांडवात जमलेले सगळेच नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घाल असे नवरदेवाला म्हणतात. पण, नवरीच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत असते. मग, नवरदेव आपल्या बायकोची परवानगी घेतो आणि “मंगळसूत्र घालू का” असे विचारतो. तेव्हा नवरी मान डोलावत आणि नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि सगळेच जण तांदूळचा वर्षाव करत जोडप्याला आशीर्वाद देतात.
नवरदेव फक्त तिच्या होकाराची वाट पाहत होता (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, नवरदेवाने मंगळसूत्र घालण्याआधी परवानगी घेतल्यामुळे नवरीच्या चेहऱ्यावरची चिंता दूर झाली आणि आनंद दिसू लागला आणि आपला लग्न करण्याचा निर्णय चुकला नाही याची तिला जाणीव होते. त्यानंतर नवरदेव तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. लग्नात उपस्थित सगळेच जण जोडप्यावर तांदळाचा वर्षाव करून जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करतात आणि इथेच व्हिडीओचा शेवट होतो. सोशल मीडियावर व्हायरल होर्ना हा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @s_pyder.g या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा ती हसली तेव्हा त्याला जग जिंकले असे वाटले’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. “त्याने परवानगी घेताच ती लगेच कम्फर्ट मोडमध्ये स्विच झाली”, “नवरदेव फक्त तिच्या स्माईलची आणि होकाराची वाट पाहत होता”, “सगळे त्याला मंगळसूत्र घाल असे म्हणत होते. पण, तो तिच्या होकारासाठी थांबला होता”; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.