Little Girl Dance Viral Video : आजकाल सोशल मीडिया विविध कलांसाठीचे व्यासपीठ असते. दररोज सोशल मीडियावर काही ना काही व्हिडीओ चर्चेचा विषय बनतो. लोक व्हिडीओ पाहतात आणि एकमेकांसोबत शेअरही करतात. एखादा डान्स व्हिडीओ आला तर तो लगेच व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ अलिकडे व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील मुलीचा डान्स आणि तिच्या अदा साऱ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
साई बाबांचे सुंदर भक्तीगीत ‘मी निघालो तुम्ही येता का’ तुम्ही नक्कीच ऐकले असेल. आज या गाण्यावर चिमुकलीने जबरदस्त डान्स केलेला दिसतो आहे. बाबांच्या खांद्यावर उभी राहून ही चिमुकली अगदी सुंदररित्या डान्स करताना दिसते आहे. कुठेही तिचा आत्मविश्वास डगमगला नाही, कुठेही तिचा तोल गेला नाही. तसेच तिच्या जबरदस्त एक्स्प्रेशनने तर सगळेच तिचे फॅन झाले आहेत. तसेच गाण्याच्या प्रत्येक ओळीवर तिची प्रत्येक अनोखी स्टेप लक्षवेधी ठरते आहे.
“साई बाबांची लहान सई” (Viral Video)
लहान मुले घरात मस्ती करतील, डान्स करतील; पण सगळ्यांसमोर डान्स करायला घाबरतील किंवा लाजतील. पण, व्हायरल व्हिडीओतील चिमुकलीने दिलेले ठुमके, तिचे एक्स्प्रेशन, परफेक्ट स्टेप्स, ताळमेळ, तिचा तोल एकूणच सगळ्याच गोष्टी अगदी बघण्यासारख्या आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघण्याची तुम्हाला नक्कीच इच्छा होईल. चिमुकलीचा भन्नाट डान्स एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @little_queen_viha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “एक्स्प्रेशन आणि डान्स” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “साई बाबांची लहान सई बाई”, “खूप छान”, “ओम साई राम” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.
