Viral Video Of Little Girl : लग्न, वाढदिवस असो किंवा आणखीन कोणता कार्यक्रम, आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी मोठमोठ्याने गाणी लावून आपण सगळेच जण डान्स करतो. मोठमोठ्याने वाजणारी ही गाणी ऐकून आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या मंडळींचेदेखील पाय थिरकण्यास सुरुवात होते. तर काही जण अक्षरशः घरीच डान्स करण्यास सुरुवात करतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यामध्ये एक कार्यक्रम सुरू असतो आणि गाणे ऐकू येताच चिमुकली तिच्या घराच्या टेरेसवर नाचण्यास सुरुवात करते.

तर ९० च्या दशकातील ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आपल्यातील अनेकांनी पहिला असेल. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान, काजोल व राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील त्यांच्या लव्ह ट्रँगलची गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात गाजली. या चित्रपटातील अनेक गाणी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘साजन जी घर आये’ हे गाणे. हे गाणे आज एका कार्यक्रमात डीजेवर लावण्यात आलेले असते आणि ते गाणे ऐकून चिमुकली तिच्या घराच्या टेरेसवर जाते आणि नाचण्यास सुरुवात करते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…शिक्षिकेच्या कार्याला सलाम! विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर बनवलं तिचं कटआऊट; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, रात्रीची वेळ आहे. एखाद्या कार्यक्रमात ‘साजन जी घर आये’ हे गाणे वाजत असते. हे गाणे ऐकून चिमुकली टेरेसवर जाऊन डान्स करण्यात सुरुवात करते. या गाण्यावर चिमुकलीने दिलेले ठेके, तिचे एक्स्प्रेशन, तिच्या परफेक्ट स्टेप्स आदी सगळ्याच गोष्टी अगदी कौतुकास्पद आहेत. एक अज्ञात व्यक्ती या चिमुकलीला नकळत पाहते आणि तिचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करून घेते. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरसुद्धा करते.

अरे प्रॅक्टिस हे काय असतं…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @pg_sad_love_880 आणि @the_ultimate_trolls_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘इंटरनेटवरील सगळ्यात क्युट व्हिडीओ’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुकलीच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय, ‘अगदी सावलीसुद्धा परफेक्ट आहे.’ दुसरा युजर म्हणतोय, ‘अरे, प्रॅक्टिस हे काय असतं.’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader