Video Shows Man Meeting His Best Friend After 25 Years : आयुष्यात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि अगदी सुख-दुःख सांगण्यासाठी प्रत्येकाला मित्रांची गरज असते. मग तो मित्र, शाळा, कॉलेज, ऑफिसमधला का असेना. असं म्हणतात की, स्त्रियांची मैत्री ही भावनिक आणि पुरुषांची मैत्री ही व्यवहारिक असते. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून पुरुषांचीही मैत्री भावनिक असते असे तुम्ही नक्कीच म्हणाल. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ; ज्यामध्ये २५ वर्षांनी दोन मित्र भेटले आहेत.
इन्स्टाग्राम युजरने @thirthaaaaaaaaaaaaaa तिच्या बाबा आणि मित्राचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की, त्यांच्या जवळच्या मित्राला, जेकब काकाला भेटायला जायचं आहे. तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. कारण तिच्या बाबांचा चेहरा अगदी लहान मुलासारखं आनंदी आणि उत्साही झाला होता. मग बाबा आणि लेक स्टेशनवर पोहचले. त्यानंतर ट्रेनमधून त्यांचे मित्र उतरतात आणि एकमेकांना मिठी मारतात आणि हा आनंदाचा क्षण ती व्हिडीओत कॅप्चर करते.
हीच पुरुषांची मैत्री असते (Viral Video)
लेकीने लिहिलेल्या कॅप्शननुसार बाबा आणि त्यांचे मित्र अनेक वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात असताना भेटले होते. त्यामुळे त्यांची मैत्री खूप जुनी आहे. रेल्वे स्टेशनवर त्यांच्या मित्राची वाट पाहत असताना, त्यांनी मला त्यांच्या सैन्याच्या काळातल्या मजेदार किस्से आणि व्हॉलीबॉलमुळे त्यांचे नाते कसे जुळले ते सांगितले. त्यांचे हृदय आनंदाने आणि नाचत आणि उड्या मारत होते; जोपर्यंत त्यांचा मित्र ट्रेनमधून उतरत नव्हता. दोन मित्रांचा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thirthaaaaaaaaaaaaaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “त्यांचे रियुनियन पाहणे हा खूप सुंदर क्षण होता” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत आणि त्यांच्या मैत्रीचे विविध शब्दात कौतुक करताना दिसत आहेत आणि “हीच पुरुषांची मैत्री असते”, “आपल्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची मजा काही वेगळीच आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.