Viral video shows mountain Cycle ride : लहान असताना आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानेच एकदा तरी सायकल चालवली असेल. काही जणांनी तर सायकलवर बसून थोडीफार स्टंटबाजीसुद्धा केली असेल. पण, आज या तरुणाने मात्र अख्ख्या जगात कोणी चालवली नसेल अशी सायकल चालवली आहे. पर्वतरांगांवरून सायकल घेऊन स्टंट करू पाहणाऱ्या एका रायडरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर काय आहे या व्हिडीओत खास, जे पाहून नेटकरीही चकित झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ इटलीचा आहे. व्हिडीओची सुरुवात तरुणाच्या सायकल चालवल्याने होत आहे. पण, ही सायकल तो उंच पर्वतरांगांवरून चालविताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तरुण सायकलवर बसतो आणि चालवण्यास सुरुवात करतो. इटालियन स्नोबॉर्डर, मार्को बासोट, असे या माउंटन बायकरचे नाव आहे; जो असे खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. इटलीमध्ये असणाऱ्या पर्वतांच्या रांगांमध्ये तो सायकल चालवताना दिसला आहे. नक्की बघा हा स्टंट व्हिडीओ…

हेही वाचा…‘तड़प-तड़प के इस दिल से…’ स्कूटरची रोजची कटकट पाहून ग्राहक वैतागला; थेट शोरूमला पोहचला अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

उंच पर्वताचा थरारक स्टंट :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीत तरुण सायकल चालवत आहे. पर्वतरांगांवरून अगदी धोकादायक पद्धतीने, तोल सावरत सायकल चालवून एका ठिकाणी येऊन थांबतो आणि युजर्सना आजूबाजूचे भव्य दृश्य व्हिडीओद्वारे दाखवतो. तुम्ही हे दृश्य पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, तरुण केवढ्या उंचावर सायकल चालविण्यासाठी आला आहे. एकंदरीतच पर्वतरांगांवरून त्याची सायकल चालवण्याचे कौशल्य तुम्हालाही चकित करून सोडेल एवढे नक्की.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @marcobassot या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुण एवढ्या उंचावर जाऊन पुन्हा खाली कसा उतरला हे व्हिडीओत दाखवलेलं नाही. तसेच व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे, “कोणतीही चूक करण्याची तुला परवानगी नाही.” दुसरा युजर म्हणतोय, “हे पाहून माझ्या हृदयाचे ठोके वाढले.” तसेच सोशल मीडिया युजर्समध्ये चर्चा सुरू झाली की, हा व्हिडीओ खरा आहे का? तर काही जणांना हा व्हिडीओ खरा असल्याची खात्रीदेखील पटली आहे.