viral video man completes 26 km run for girlfriend : प्रेयसीचा वाढदिवस असेल तर प्रियकर तिला खुश करण्यासाठी प्रत्येक गोष्ट करायला तयार होतो. चॉकलेट, फुलं, अगदी सरप्राईज प्लॅन, २५ व्या वाढदिवसाला २५ गिफ्ट किंवा लग्नासाठी प्रपोज आदी अनेक गिफ्ट्स प्रेयसीला देण्याचा विचार करतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये प्रेयसीच्या २६ व्या वाढदिवसाला प्रियकराने जबरदस्त गोष्टी केली आहे; जे पाहून तुम्हीही थक्क होऊन जाल
बंगळुरूचा अविक भट्टाचार्य नावाचा प्रियकर आपल्या गर्लफ्रेंडच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त २६ किलोमीटर धावला आहे. भट्टाचार्यने हा व्हिडीओ स्वतःच्या आणि त्याची गर्लफ्रेंड सिमरनच्या @simranxavik या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार गर्लफ्रेंड सिमरनचा यंदा २६ वा वाढदिवस होता. त्यामुळे २६ व्या वाढदिवसाला तिला २६ किलोमीटर धावायचे होते. पण तिची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रियकर २६ किलोमीटर धावला.
२६ व्या वाढदिवसाला २६ किलोमीटर धावला (Viral Video)
धावायला सुरुवात करताना प्रियकर छोटे व्हिडीओ शूट करत तिच्या चांगल्या आरोग्यासाठी विचार, प्रार्थना करत असतो. तसेच धावताना तो इयरफोन वापरत नाही. कारण मानसिक शांतता राखण्यासाठी आणि सिमरनसोबतच्या आनंददायक आठवणींवर विचार करण्यासाठी चालायला आला आहे. तो हेही सांगतो की, सिमरन मुंबई मॅरेथॉनसाठी तयारी करत आहेत; जी दोन अडीच आठवड्यांमध्ये आहे. हे सगळं पाहून प्रियकराने केलेली ही गोष्ट पाहून प्रेयसी भारावून गेली आणि “या माणसाची बरोबरी कशी करावी हेच मला कळत नाही” असं नकळत म्हणून गेली.
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/reels/DTHjNtdAMXf
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @simranxavik या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून प्रियकराचे कौतुक करताना दिसत आहेत आणि “भाऊ, स्टॅंडर्ड्स सेट करत आहेस”, “आता २६ वेळा ‘नाही, नाही असं लिहायला हवं. म्हणजे, अशा व्यक्ती जगात कुठे मिळतील, कमा”, “माझ्या मानसिक शांततेसाठी, मी समजतो की हे एआय असावं”, “ताई कोणता नवसं केला होतास?” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…
