video Shows man saves toddler : लहान मुलांना सांभाळणे वाटते तितके सोपे नसते. मुलांना सांभाळताना पालकच चिडतात, संतापतात त्यांचा अगदी पेशंसही संपतो. पण, लहान मुलांना सांभाळणे म्हणजे अतिशय पेशन्सचे काम असते. तुमची नजर चुकली की, ते काय करून बसतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. त्यामुळे अगदी बाहेर गेलो तरी त्यांच्याकडे प्रत्येक क्षणाला लक्ष ठेवून राहावे लागते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे; यामध्ये एका चिमुकलीबरोबर मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एक बाबागाडीत ( स्ट्रोलर ) बसलेलं बाळ बहुतेक वाऱ्याने रस्त्यावरून सरकत उतारावर घसरत खाली येत असते. ही घटना रस्त्यावरून येणारा एक दुचाकी चालक पाहतो आणि कशाचाही विचार न करता गाडी जमिनीवर आडवी करून बाबागाडीकडे धावत जातो. बाळ उतारावरून आणखीन खाली जाईल इतक्यात दुचाकी चालक बाबागाडीत थांबवतो आणि बाळाला जवळ घेतो. त्यानंतर मागून आई सुद्धा धावत येते आणि बाळाला स्वतःजवळ घेते.

या माणसाबद्दल आदर वाटतोय (Viral Video)

सिनेमामध्ये एखाद्यावर कठीण प्रसंग आल्यावर हिरोची बाईकवरून एंट्री होते आणि तो काही सेकेंदात परिस्थिती सांभाळतो. तसेच खऱ्या आयुष्यात काही माणसे देवासारखी मदत करायला येतात आणि खऱ्या आयुष्यातील हिरो बनून जातात. आज व्हायरल व्हिडीओत तर याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले आहे. बाईक चालवताना समोरून उत्तरावरून खाली घसरणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी तो अगदी हिरोप्रमाणे बाईकवरून उतरतो आणि धावत-पळत जाऊन बाबागाडी थांबवतो. एकदा बघाच हा अंगावर काटा आणणारा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Tsf Memes (@sab_kuchh_milegaa)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sab_kuchh_milegaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘त्याला कशाचीही पर्वा नव्हती, त्याच्या मनात फक्त बाळ होते; या माणसाबद्दल आदर वाटतोय’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून स्टिकर्स, ईमोजीसह दुचाकी स्वराचे कौतुक करताना दिसून आले आहेत आणि या व्हिडीओने सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.