Video Shows Man Crushing Walnuts With Elbow : अक्रोड खाणे आपल्या दातांसाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडच्या झाडाच्या सालापासून तयार केली गेलेली पेस्ट ही हिरड्या आणि दातांच्या इतर समस्यांवरील उपचारांसाठी वापरली जाते. तर घरामध्ये गोड पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक म्हणून सुक्या मेव्याचा एक डबा स्वयंपाकघरात तुम्हाला अवश्य दिसेल. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता यांच्याबरोबर अक्रोडचा सुद्धा समावेश असतो. आतापर्यंत तुम्ही अक्रोडचा उपयोग पदार्थांची चव वाढविण्यासाठी किंवा सजावट करण्यासाठी केला गेल्याचे पाहिले असेल. पण, आज एका पठ्ठ्याने अक्रोडचा वापर करून विश्वविक्रम केला आहे. व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानचा आहे. एका व्यक्तीने कोपराने अक्रोड फोडूनन विश्वविक्रम केला आहे. मुहम्मद रशीद असे या व्यक्तीचे नाव आहे. एका मैदानात स्पर्धा सुरू आहे. एका टेबलावर एका क्रमात काही अक्रोड ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर अवघ्या ३० सेकंदांत १५० पेक्षा जास्त अक्रोड फोडून एकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण, तुम्ही म्हणाल यात काय खास आहे. तर या व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, व्यक्तीने एखाद्या वस्तूने किंवा दाताने नाही तर कोपराने अक्रोड फोडून हा विश्वविक्रम केला आहे. नक्की पाहा हा व्हिडीओ… हेही वाचा…Swan Video: पाण्यात पिल्लांसह पोहण्यासाठी हंसाने बनवलं पंखांचं घर; चारही पिल्ले बसली पाठीवर अन्… पाहा सुंदर क्षण व्हिडीओ नक्की बघा… https://www.instagram.com/reel/C-fYUoPi81v/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading कोपराने अक्रोड फोडून केला विश्वविक्रम : पाकिस्तान येथे राहणारे मुहम्मद रशीद दररोज चार ते पाच तास यासाठी मेहनत करायचे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, टेबलावर क्रमाने काही अक्रोड ठेवले आहेत. वेळ सुरू होताच घाम न गाळता, कुठेही न थांबता एक व्यक्ती कोपराने हे अक्रोड फोडण्यास सुरुवात करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर @guinnessworldrecords या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या (GWR) अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर व्हिडीओला "१६९ अक्रोड ३० सेकंदांत कोपराने ठेचले… मुहम्मद रशीद…गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स", अशी कॅप्शन देण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सशी बोलताना पाकिस्तानी पट्ठ्या म्हणाला, “पहिल्यांदा जेव्हा मी हा विक्रम मोडला तेव्हा ते सोपे होते; पण कालांतराने हे कठीण होत गेले. कारण- इतर अनेक खेळाडूंनी हा विक्रम मोडला. त्या प्रशिक्षणादरम्यान वेग, फोकस वाढवणे थोडे जास्त कठीण होते . प्रशिक्षणाच्या काळात माझ्या कोपराला अनेक वेळा दुखापत झाली; पण त्यामुळे मी थांबलो नाही. कारण- मी कोणत्याही किमतीत हा विक्रम पुन्हा मिळवण्यासाठी उत्सुक होतो,” असे त्यांनी नमूद केले आहे.