Viral Video: आजकाल सोशल मीडियावर रील्स (Reels) जास्तच ट्रेंडमध्ये आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करताच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. म्हणून अनेक जण आवड म्हणून, काही जण स्वतःचा व्यवसायात प्रगती करण्यासाठी, तर बहुतांश जण फक्त प्रसिद्ध होण्यासाठी या रील्सचा उपयोग करतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये व्यक्ती रस्त्याच्या मधोमध खुर्चीवर बसून रील शूट करताना दिसली आहे. तसेच असं करणं त्या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा आहे. दिल्लीच्या जीटी कर्नाल रोडवर गाड्यांची रहदारी सुरू आहे. पण, रस्त्याच्या मधोमध एक खुर्ची आणि बाईक पार्क केलेली दिसते आहे. व्हिडीओ सुरू होताच एक जण एंट्री करतो आणि तो रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या खुर्चीवर येऊन अगदी थाटात बसतो. फक्त रील बनविण्यासाठी त्यानं हे धाडस केल्याचं समजून येत आहे. पुढे नक्की काय घडलं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…जेव्हा किराणा दुकानातून बाबा होतात निवृत्त; ३३ वर्षांचा प्रवास अन्… लेकाने सांगितली गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तो गृहस्थ रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या खुर्चीवर येऊन बसतो. त्यादरम्यान कोणताही अपघात किंवा एखाद्या वाहनाची टक्करदेखील झाली असती. आपण वाहतुकीचे नियम तोडतो आहोत या गोष्टीचं भान न बाळगता ही व्यक्ती रस्त्यावर सर्रास रील बनवते आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी विपिन कुमार नावाच्या २६ वर्षीय व्यक्तीस निर्णायक कारवाई केली आहे, असे तुम्हाला व्हिडीओच्या शेवटी दिसून येईल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ स्वतः दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @DelhiPolice या अकाउंटवरून शेअर केला आहे आणि रील बनविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोटार वाहन कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच व्यक्तीची मोटरसायकल आणि मोबाइल फोनदेखील जप्त केला आहे. त्याव्यतिरिक्त त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट हटविण्याची (डिलीट) करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे, असे दिल्ली पोलिसांनी एक्स (ट्विटर)वर लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows man sits on chair and parks bike in middle of road for reel later arrested watch ones asp
First published on: 30-04-2024 at 13:34 IST