Viral Video : झोप सकाळची असो वा दुपारची किंवा रात्रीची ती सगळ्यांनाच प्रिय असते. दिवसभर धावपळ करून आपण जेव्हा निवांत झोप घेतो तेव्हा थकवा निघून जातो. अशातच काही जण असे असतात की, ज्यांना कितीही गोंधळात शांत झोप लागते आणि काही असे असतात की, ज्यांना बंद खोलीत एकटे झोपायला आवडते. पण, सोशल मीडियावर आज असा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे; ज्यामध्ये एक व्यक्ती झोपण्यासाठी चक्क बिल्डिंगच्या टेरेसवर गेली आहे. नक्की काय घडलं ते बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, व्हिडीओच्या सुरुवातीला इमारतीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती अंथरूण घालून झोपल्याचे दिसत आहे. या इमारतीच्या बाजूला एक पूल असतो. त्या पुलावरून जाताना एक व्यक्ती हे पाहते आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करण्यात सुरुवात करते. ही व्यक्ती एवढी गाढ झोपलेली असते की, खूप माणसे तिला बघत आहेत याचेसुद्धा तिला भान नसते. नक्की ती व्यक्ती कशा प्रकारे झोपली आहे ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
elephant and her baby viral video
अरेरे! पिल्लाला झोपेतून उठवणारी आई; कधी सोंड, तर कधी शेपटी ओढत प्रयत्न सुरू; Viral Video पाहून आवरणार नाही हसू
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल
Benefits of wearing socks at night
Sleeping With Socks : रात्री मोजे घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे; पण ‘या’ चुकांमुळे होतील अनेक आरोग्य समस्या
which is the best pillow for sleep snoring and pillow
तज्ज्ञांनी सांगितलेली ही उशी तुमचे घोरणे कमी करू शकते? जाणून घ्या…
Daughter takes mother to salon for first time
‘लेक असावी तर अशी… ‘ पहिल्यांदा आईला घेऊन गेली पार्लरला अन्… Viral Video तून पाहा ‘तिच्या’ चेहऱ्यावरील आनंद

हेही वाचा…नवऱ्याची निघाली वरात! वरातीत नाचताना ‘त्याने’ पाळीव श्वानाला उचलून घेतलं अन्… पाहा VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, पाण्याच्या टाकीवर अंथरूण घालून, डोळ्यांवर काळी पट्टी लावून, अंगावर चादर घेऊन ही व्यक्ती अगदी गाढ झोपलेली दिसते आहे. या गाढ झोपलेल्या व्यक्तीला पाहून काही जणांना ती व्यक्ती देवाघरी गेली की काय, असादेखील प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांनी अग्निशमन दलाला कळवून, त्यांना बोलावून घेतलं आहे. अग्निशमन दलाचे जवान एक शिडी लावून पुलावरून थेट पाण्याच्या टाकीवर उतरतात आणि इथेच व्हिडीओचा शेवट होतो.

कितने तेजस्वी लोग है…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @krishna_01__uk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. झोपायची ही कोणती पद्धत, कितने तेजस्वी लोग है, घरातून काढून टाकलं असेल म्हणून इथे येऊन झोपला आहे, झोपू द्या बिचाऱ्याला आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसून येत आहे. एकूणच सोशल मीडियावर या अजब व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Story img Loader