Viral Video: उन्हाळा म्हणजे सूर्यप्रकाश, घाम व आर्द्रता यांचा हंगाम. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हामुळे कुठेही बाहेर जावेसे वाटत नाही. सतत काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते आणि पंखा, एसी किंवा कूलरसमोर शांतपणे बसून राहावेसे वाटते. तर समाजमाध्यमांवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका व्यक्तीनं उष्ण वातावरणापासून बचाव करण्यासाठी हटके उपाय शोधून काढला आहे; जो पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

व्यक्ती कूलिंग सेटअपसमोर अगदी शांतपणे झोपलेली दिसत आहे. तसेच थंडगार हवेसाठी एका कूलरला खुल्या फ्रिजसमोर उभा केला आहे. व्यक्तीनं फ्रिजची मदत घेऊन, थंडगार हवेसाठी जुगाड केला आहे. त्याच्या या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचं कौतुक होण्याऐवजी, त्या व्यक्तीला नेटकऱ्यांच्या टीकांना तोंड द्यावं लागत आहे. या व्यक्तीनं नक्की काय जुगाड केला आहे चला पाहू.

security forces on high alert in jammu and kashmir due to hidden terrorism
छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश
Young Boys Using Mixer Grinder To Making Wheat Roti And Grind Atta In Just Two Miniutes Watch Viral Video Of Desi Jugaad
पीठ न मळता पोळ्या करण्यासाठी तरुणांचा जुगाड; मिक्सरच्या भांड्याचा केला असा उपयोग की… VIDEO पाहून हसून व्हाल लोटपोट
Assam Floods Man risks life to rescue calf from drowning
Assam Floods : वासराला वाचवण्यासाठी व्यक्तीने थेट पुराच्या पाण्यात मारली उडी, Viral Videoमध्ये थरारक दृश्य कैद
weight gain and exercise
झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या
man went near the leopard
बापरे! फोटो काढण्यासाठी बिबट्याजवळ गेला अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Careers And Jobs After Liberal Arts Degree
चौकट मोडताना : परदेशी जाण्याचा खर्चिक मार्ग
Rising Crime in Pimpri Chinchwad, Challenge for the Police Commissionerate of Rising Crime in Pimpri Chinchwad, scared Citizens due to Violence and Lawlessness Persist in pimpri chichwad, pimpri chinchwad citizens
हतबल पोलीस; भयभीत पिंपरी-चिंचवडकर!

हेही वाचा…रस्ता ओलांडताना चिमुकलीचं ‘हे’ कृत्य पाहून आनंद महिंद्राही इम्प्रेस; VIDEO शेअर करीत म्हणाले की, ‘संपूर्ण जग…’

व्हिडीओ नक्की बघा…

तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्तीनं थंडगार कूलरसाठी अनोखा जुगाड केला आहे. आपण अनेकदा कूलरमध्ये बर्फ किंवा बर्फाचं पाणी टाकतो; जेणेकरून थंडगार हवा मिळेल. पण, या व्यक्तीनं असं करण्याऐवजी देशी जुगाड केला. त्यामध्ये त्यानं खुल्या फ्रिजसमोर कूलर ठेवून स्वस्तात मस्त एसी बनवला आहे. या पठ्ठ्याची ही ‘कामगिरी’ तुम्हीही डोक्याला हात लावला असेल ना?

समाजमाध्यमांवर हा व्हायरल व्हिडीओ @WokePandemic या एक्स ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्याच्या क्लृप्तीला देसी जुगाड तर म्हणतच आहेत. पण, काही जण त्यामुळे वीजबिलसुद्धा भरभक्कम येईल, असंसुद्धा म्हणताना दिसत आहेत. एकूणच या अजब जुगाडानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.