Viral Video: केस हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपले केस काळे, मजबूत असावे, आपले केस गळू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. केसांची निगा राखण्यासाठी, योग्य आहार, शॅम्पू-कंडिशनर बरोबर योग्यवेळी हेअर कट करणेही तितकेच महत्वाचे असते. तसेच दर तीन ते चार महिन्यांनी केस थोडेसे ट्रीम करावे, यामुळे केसांची वाढ चांगली होते ; असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते. केसांमुळे आपले सौंदर्य असते म्हणून पार्लरमध्ये गेल्यावर आपण त्यांना आपले केस काळजीपूर्वक कापण्यास सांगतो. पण, आज सोशल मीडियावर काही तरी वेगळचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये चक्क पंख्याच्या मदतीने हेअरकट करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. एक तरुणी पार्लरमध्ये केस कापताना दिसत आहे. पण, तिचा हेअरकट करताना केशकर्तनकार पंखा, सेलोटेपचा वापर करताना दिसत आहेत. सुरवातीला पार्लरमधील केशकर्तनकार तरुणीच्या केसांमध्ये चिकटपट्टी ठेवतो. प्रथम संपूर्ण केस टेपच्या मध्यभागातून काढले जातात. नंतर टेबल फॅनच्या रिंगमधून तिचे केस अलगद बाहेर काढतो. टेबल फॅनच्या रिंगवर केस पसरवून केशकर्तनकार हेअरकट करण्यास सुरुवात करतो. अनोखा हेअरकट व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…जेव्हा बॉम्ब शोधणारा साथीदार होतो निवृत्त; पोलिस खात्याकडून शानदार निरोप, पाहा श्वान ‘तारा’चा हा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, टेबल फॅनच्या गोलाकार रिंगभोवती केस पसरवतो आणि कापण्यास सुरुवात करतो. संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण – असं बघायला गेलं तर महिलांना त्यांचे केस जिवापेक्षा जास्त प्रिय असतात. पण, चिकटपट्टी आणि पंख्याच्या रिंग वापरून केस कापले जात आहेत. तरीही तरुणी काहीच बोलत नाही किंवा केशकर्तनकारला हेअरकट करण्यापासून थांबवत सुद्धा नाही ; जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chattisgarhwale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून नेटकरीही मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एका युजरने हा तर ‘पंखा कट’ आहे अशी कमेंट केली आहे. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच तुम्हीदेखील हा व्हिडीओ पाहून म्हणाल असा हेअरकट आम्ही आजवर कधी पहिला नाही.