Viral Video Shows Monkeys Attack Elderly Woman : जंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा मानवी वस्तीतही येतात. ते एकटे नाही तर अनेकदा कळपातून फिरतात. पण, जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही. आपल्याजवळ असणारा मोबाइल, खाण्याच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या हातातून हिसकावून घेऊन जायला ही माकडे मागे-पुढे बघत नाहीत. आज तर या माकडांनी हद्दच पार केली आहे; माकडांच्या कळपाने वृद्ध महिलेवर हल्ला केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
तेलंगणातील करीमनगरमध्ये एक वृद्ध महिला घराबाहेर केर काढत असते. तितक्यात तिच्यावर माकडांच्या कळपाने हल्ला केला आहे. एक माकड वृद्ध महिलेच्या साडीचा पदर ओढताना दिसत आहे, तर दुसरा तिला जमिनीवर ढकलतो तर तिसरे माकडदेखील तिच्या चप्पल ओढत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. तीन माकडांनी हल्ला केल्यामुळे वृद्ध महिला जमिनीवर पडलेली दिसते आहे. तसेच माकडांच्या हल्ल्यात ती किरकोळ जखमीसुद्धा झाली आहे.
आजकाल, महिला पुरुषांपेक्षा धाडसी आहेत (Viral Video)
वृद्ध महिलेवर होणारा माकडांचा हल्ला पाहून एका पुरुषाने गेटच्या आतमध्येच उभं राहून मोठ्याने आवाज करून माकडांना घाबरवण्याचा प्रयत्न केल, पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अखेर एका महिलेने मध्यस्थी केली, हिंमत दाखवून, हातात काठी घेऊन तिने माकडांवर हल्ला करण्यास धावत गेली, त्यामुळे तिन्ही माकडं घाबरली आणि पळून गेली. त्या महिलेने वृद्ध महिलेला जमिनीवरून उठण्याससुद्धा मदत केली.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @we_r_karimnagarians या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वृद्ध महिलेबद्दल चिंता व्यक्त करून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. पुरुषावर वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी त्वरित प्रतिक्रिया न दिल्याबद्दल टीका केली, तर काहींनी दोन्ही महिलांच्या धाडसाचे कौतुक करत “आजकाल महिला पुरुषांपेक्षा धाडसी आहेत”, असे आवर्जून म्हटले आहेत; तर काही युजर्सनी सरकारवर पुरेसे काम करत नसल्याबद्दल टीका केली आणि म्हटले की, “भारतात भटकी माकडे, श्वान आणि बैल आता माणसांसाठी समस्या निर्माण करत आहेत. आपले सरकार कोणतीही जबाबदारी घेत नाही”, आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.