mother in law and daughter in law viral video : लग्नानंतर मुलींना चांगली बायको होण्याबरोबरच चांगली सून होण्याचं सुद्धा दडपण असतं. त्यामुळे अनेकदा सासू-सुनेमध्ये खटके उडतात. पण, जर हे नाते योग्य, समजूतदारपणाने आणि प्रेमाने जपले तर ते तुमचा संसार आणखीन सोपा आणि आनंदी होण्यास मदत होते. एकमेकींच्या जगण्याच्या पद्धती समजून घेतल्या की, भांडणांना जागा उरत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये नवीन सुनेची हौस पूर्ण करण्यासाठी सासूने भन्नाट साथ दिलेली दिसते आहे.
सैलाब चित्रपटातील ‘हमको आजकल है’ गाण्यावर सासू आणि सून भन्नाट डान्स करताना दिसते आहे. निमित्त काय तर सुनेची डोहाळे जेवण. तर या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला “उलझी है ये किस चाल में तू. है आज कल किस हाल में तू” या गाण्याचे बोल सुरु होतात आणि सासू सुनेच्या पोटाकडे पाहत मजेशीर आणि आनंदी अंदाजात नाचताना दिसते. हे गाणं गरोदरपणात होणाऱ्या चालण्यातल्या बदलांवर आणि रोज बदलणाऱ्या मूड्सवर हलक्याफुलक्या पद्धतीने नकळत अगदी योग्य वाटत असल्यामुळे सगळेच या क्षणाचा आनंद घेताना दिसतात.
फक्त सासूबाई एवढ्या हौशी पाहिजे (Viral Video)
मातृत्व ही महिलांच्या जिवनातील सुंदर अनुभव असतो.कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे कोड कौतुक करत असतात. महिलेच्या या आईपणाच्या प्रवासात तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला जातो. लवकरच होणाऱ्या आईसाठी अगदी थाटामाटात सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर या होणाऱ्या आईची गरोदरपणात नाचण्याची इच्छा होती, जी सासू आणि नवऱ्याने मिळून पूर्ण केली आहे. डोहाळे जेवणात अनोख्या गाण्यावर डान्स केलेल्या सासू आणि सुनेचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bharti_makeup_artist_23 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासूबाई एवढ्या हौशी पाहिजे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “इथून पुढच्या मुलींना सर्वांना एवढी हौशी सासू मिळावी ….बस आयुष्य खूप सुंदर आहे मग”, “सासूबाई हौशी असेल तर सूनबाई आनंदात जगते”, “खूप खूप छान”, “बाळ नाचतच एन्ट्री घेईल ह्या जगात” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
.
