Video Shows Motorman Stop Express Train On Platform For Elderly Couples : भारतात रेल्वेने दररोज अनेक प्रवासी प्रवास करीत असतात. पण, थोडा जरी उशीर झाला की, ट्रेन सुटलीच म्हणून समजा. मुंबईत एक लोकल गेल्यावर दुसरी येते. पण, ज्या एक्स्प्रेस गाड्या असतात, त्या वेळेत येऊन वेळेतच निघून जातात. त्यामुळे वेळेत न पोहोचल्यास ती ट्रेन सुटलीच म्हणून समजा. पण, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; त्यामध्ये एक्स्प्रेसच्या मोटरमनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आजी-आजोबा सामान घेऊन रेल्वेस्थानकावर पोहोचतात. रेल्वेस्थानकावर पोहोचताच एक्स्प्रेस त्यांच्या डोळ्यांसमोरून जात असते. त्यादरम्यान एक्स्प्रेसचा मोटरमन आजोबांना दिसतो. आजोबा मोटरमनकडे बघून गाडी थांबवण्याची विनंती करतात. मोटरमनही एक्स्प्रेस थांबवतो. मोटरमन एक्स्प्रेस थांबवतो आहे हे कळताच आजी-आजोबा धावत एक्स्प्रेसपाशी जातात. त्यानंतर ट्रेन थांबवल्यावर ट्रेनमध्ये चढतात आणि इथेच व्हिडीओचा शेवट होतो.
अशा माणसांमुळेच माणुसकी अजूनही जिवंत आहे (Viral Video)
नागरिकांना शिस्त लागावी म्हणून भारतात अनेक प्रकारचे नियम लागू केले गेले आहेत. क्रिकेट खेळताना, प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वी तिकीट काढणे, प्रवासात आपली सीट कोणाला न देणे आदी अनेक नियम जरी असले तरीही एखाद्याची परिस्थिती समजून घेऊन हा नियम आपण नक्कीच मोडू शकतो; पण त्यात फक्त मदतीची भावना असली पाहिजे. तर आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत हेच पाहायला मिळाले आहे; ज्यामध्ये आजी-आजोबांना सामान हातात घेऊन धावत आलेले पाहून मोटरमन एक्स्प्रेस थांबवतो.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सॅल्यूट आहे भाऊ’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली गेली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून “मीपण माझ्या ताईबरोबर कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जात असताना लोकल ट्रेन थांबवली होती”, “नियम माणसासाठी आहे; नियमासाठी माणूस नाही”, “अशा माणसांमुळेच माणुसकी अजूनही जिवंत आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.