Premium

‘बिजली बिजली’ गाण्यावर थिरकला नीरज चोप्रा; पाहा गोल्डन बॉयचा व्हायरल व्हिडिओ

नीरजचा डान्स करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा गोल्डन बॉय अगदी देसी स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

Viral Video Shows Neeraj Chopra Dancing To Bijlee Bijlee Song
'बिजली बिजली’ गाण्यावर थिरकला नीरज चोप्रा ( Image credit – Viral Bhayani / instagram)

भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने आपल्या डान्स स्टेप्सने सर्वांना वेड लावले आहे. होय, नीरज चोप्राने गुरुवारी मुंबईत इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्स कार्यक्रमात हजेरी लावली होती. भारतीय क्रिकेटर विराट कोहलीही अनुष्का शर्मासोबत या कार्यक्रमात पोहोचला होता. पुरस्कार सोहळ्यानंतर एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नीरज चोप्राने सर्वांसोबत डान्स केला. नीरजचा डान्स करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा गोल्डन बॉय अगदी देसी स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. इंटरनेटवर त्याच्या डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीरज चोप्राने कोट काढून केला देसी स्टाईल डान्स

व्हायरल व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा हार्डी संधूच्या ‘बिजली-बिजली’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नीरजसोबत कंटेंट क्रिएटर रुही दोसानी, यशराज मुखाटे आणि दीपराज जाधव देखील दिसत आहेत. थ्री-पीस सूट परिधान करून पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेल्या नीरज चोप्राने डान्स करताना आपला कोट काढला. यापूर्वी नीरज चोप्राने आपल्या स्टाईलने रेड कार्पेटवर धुमाकूळ घातला होता.

Video: मुलाला RRR पाहता यावा म्हणून जपानी फॅनने लढवली शक्कल; राजामौलींच्या सुपरहिट चित्रपटाचे तयार केले कॉमिक बुक

इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्स 2023 साठी गुरवारी रात्री मुंबईत अनेक सेलिब्रिटी जमले होते, ज्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा समावेश होता, ज्यांनी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अंगद बेदी, नेहा यांच्यासोबत पोझ दिली होती. धूपिया आणि रिया चक्रवर्ती आणि इतर सेलिब्रेटी देखील येथे उपस्थित होते.

नीरजच्या व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

व्हायरल भयानीच्या अकाऊंटवरून नीरज चोप्राच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. नीरजच्या या व्हिडिओवर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

नीरज चोप्राच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका एका यूजरने लिहिले, ”खेळाडू नीरज चोप्राला मजा करताना पाहून आनंद झाला!” तर दुसऱ्याने लिहले की, ”हा कुल चॅम्प आहे.” तिसरा युजर म्हणाला, भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे,” तर आणखी एका यूजरने म्हटले अजून खूप सारे गोल्ड मेडल मिळवणे बाकी आहे फक्त निरजच्या डोक्यात ही फेमची हवी शिरू नये म्हणजे झालं.”

हेही वाचा – या देशात नाही एकही रस्ता, कार-बाईकशिवाय कसा करतात कसा प्रवास करतात? जाणून घ्या

वाकांडा फॉरएव्हर टीझरमध्ये दिसला नीरज

नीरज चोप्रा हा वाकांडा फॉरएव्हरच्या टीझरमध्ये दिसला होता. त्यावेळी सोशल मिडियार पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘यावेळी मी ब्लॅक पँथरसाठी भाला उचलणार आहे’

तुर्कस्तानमधील ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे ६१ दिवस घेणार प्रशिक्षण

स्टार भालाफेक करणारा तुर्कस्तानमधील ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे ६१ दिवस सराव करेल, अशी घोषणा क्रीडा मंत्रालयाने सोमवारी केली. गतवर्षी ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे तसेच टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) कडून वित्तपुरवठा करून प्रशिक्षण घेतलेला हा 25 वर्षीय तरुण 1 एप्रिल रोजी तुर्कीला रवाना होईल आणि 31 मे पर्यंत तेथे राहील.

“युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (MYAS) मिशन ऑलिम्पिक सेलने (MOC) 16 मार्च रोजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना, तुर्की येथे 61 दिवसांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली,” असे मंत्रालयाने एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. .

“TOPS निधीमध्ये नीरज, त्याचे प्रशिक्षक क्लॉस बारटोनिएझ आणि त्याच्या फिजिओथेरपिस्टचे विमान भाडे, बोर्डिंग आणि लॉजिंग, वैद्यकीय विमा आणि स्थानिक वाहतूक खर्च यांचा समावेश असेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video shows neeraj chopra dancing to bijlee bijlee song snk

First published on: 27-03-2023 at 12:33 IST
Next Story
Video: मुलाला RRR पाहता यावा म्हणून जपानी फॅनने लढवली शक्कल; राजामौलींच्या सुपरहिट चित्रपटाचे तयार केले कॉमिक बुक