Viral Video Shows Fans Watch Diljit Dosanjh’s Jaipur Concert From Balcony : पंजाबी गायक दिलजीत दोसांझने जयपूरमध्ये त्याच्या चाहत्यांसाठी एक कॉन्सर्ट ठेवला होता. दिलजीत स्टेजवर येताच चाहत्यांच्या गर्दीने जल्लोष सुरू केला. त्याने आपल्या प्रसिद्ध गाण्याने शोची सुरुवात केली. या कॉन्सर्टदरम्यान दिलजीत दोसांझने गायलेल्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल व्हायरल झाले. पण, या दरम्यान असा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला, जेव्हा काही तरुणांनी हा लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी जुगाड केला. नक्की काय जुगाड केला आहे, चला जाणून घेऊ…
पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा यांचा लाइव्ह कॉन्सर्ट जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटर (JECC), सितापुरा भागात सुरू होता, तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तिथेच शेजारी एक इमारत होती. तर ही बिल्डिंग मुलांचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुण मंडळींना हा लाइव्ह कॉन्सर्ट पाहायचा असतो. हा कॉन्सर्ट बाजूलाच सुरू आहे हे समजताच तरुणांचा ग्रुप एक जुगाड करतो. नक्की तरुणांनी काय जुगाड केला व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…मित्र कसा असावा? भटक्या श्वानापासून तरुणीचे संरक्षण; पायाजवळ उभा राहिला अन्… पाहा VIRAL VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
मित्राच्या खांद्यावर बसून बघितला लाइव्ह कॉन्सर्ट :
अनेकदा आवडत्या गायकाचा लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्याची इच्छा असते. पण, लाइव्ह कॉन्सर्टचे एंट्री तिकीट महाग असल्यामुळे अनेक जण तेथे जाणं टाळतात. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हॉस्टेलमधील मुलांचा हा ग्रुप इमारतीच्या बाल्कनीत उभा आहे. ही इमारत जयपूरमधील कॉन्सर्ट सुरू असणाऱ्या ठिकाणाजवळ आहे. बाल्कनीत उभं राहून तरुणांचा हा ग्रुप लाइव्ह कॉन्सर्टची मजा घेताना दिसत आहे. तसेच ग्रुपमधील एक मुलगा तर मित्राच्या खांद्यावर बसून हा लाईव्ह कॉन्सर्ट बघण्याचा आनंद लुटत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ (Viral Video) @beingjaipurites या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘२५०० रुपये वाचवले’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा जुगाड पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘ हा राजस्थान आहे, येथे सर्व पॉसिबल आहे’, तर दुसरा म्हणतोय की, ‘देसी जुगाड’, तर तिसरा म्हणतोय की, ‘लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्याची ही तर सिल्व्हर सीट आहे’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.