sister & brother viral video : बहिणीच्या मागे कायम आधार म्हणून उभा असलेला, हक्काने ओरडणारा पण तितकीच प्रेमाने काळजी घेणारा भाऊ प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टींचा त्याग देखील करत असतो. लहानपणी एकमेकांशी भांडणारे आणि दंगा-मस्ती करणारे हेच बहिण भाऊ मोठेपणी मात्र एकमेकांचे छान मित्र-मैत्रीण होतात आणि एकमेकांना चांगल्या-वाईट प्रसंगात चांगली साथही देतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये कुटुंबासाठी अनेकदा त्याग करणाऱ्या भावाला बहिणीने सुंदर गिफ्ट दिले आहे.
मित्राची बाईक घ्यायला जायची आहे असे सांगून बहीण स्वतःबरोबर भावाला शो रूममध्ये घेऊन जाते. पेपर वर्क पूर्ण झाल्यानंतर चावी भावाच्या डोळ्यासमोर ठेवून ‘घे’ असं म्हणते. त्यावर भाऊ ‘का’ असं म्हणतो. मग बहीण ‘एक राउंड मारून येऊ चलं ‘ असं मस्तीत म्हणते. त्यावर भाऊ ‘मला नाही मारायचा राउंड’ असं अगदी गोंधळून म्हणतो. मग महिना ‘अरे घे चल, तुझ्यासाठीच गाडी घेतली आहे मी’ हे ऐकताच त्याला शॉक बसतो. त्यानंतर मागून एक मित्र म्हणतो ‘अरे मी तुला म्हंटल होतं ना माझ्या मित्रासाठी गाडी घ्यायची आहे, तूच तो मित्र’ असे सांगत बहीण भावाच्या हातात चावी देते.
“ज्याने माझ्यासाठी सगळं केलं, आज त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा दिवस” (Viral Video)
हे सगळं बघून, ऐकून भावाला काय करावं हेच सुचत नसतं. त्याच्या डोळ्यातून सतत आनंदाश्रू तरंगत असतात. मित्र, बहीण सगळे मिळून सतत त्याला अभिनंदन करत असतात. पण, भावाच्या डोळ्यांत फक्त आणि फक्त आश्रू दिसतात. बहीण आणि वडिलांनी मिळून आपल्याला गाडी घेतली आहे या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नसतो. ‘अगं ४ लाखांची गाडी आहे ती असं भाऊ म्हणतो आणि पप्पांची इच्छा होती म्हणून घेतली असं बहीण अगदी सहज म्हणून जाते’ आणि या व्हिडीओचा गोड शेवट होतो.एकदा बघाच भावा-बहिणीचा हा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bhagyashree_bauskar_28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच बहिणीने व्हिडीओला “ज्याने आत्तापर्यंत माझ्यासाठी सगळं केलं. आज त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा दिवस. आज माझ्या दादाचा वाढदिवस. आजपर्यंत स्वतःसाठी काही घेताना दहा वेळा विचार करणारा हा दादा. माझ्यासाठी काही घ्यायचं असेल तर एकदाही विचार करत नाही. आज माझी वेळ आहे तुला आनंद देण्याची. हे छोटस गिफ्ट पप्पा कडून आणि माझ्या कडून तुला दादा” ; अशी कॅप्शन दिली आहे.
