Viral Video Of Mom And Son : अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्तीला आईची गरज असते. मग तो माणूस असो किंवा प्राणी. आईच्या स्पर्शात एक वेगळ्याच प्रकारची जादू असते. तिने बनवलेले जेवण असो मग तिने मायाने केसांना लावलेले तेल असो. ती पोटाला स्पर्श करते तेव्हा हा आईचा हात आहे, हे गर्भातील मूलही ओळखते. तर आज असाच एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे; एका खेळात आईने आपल्या मुलाला फक्त स्पर्शाने ओळखले आहे, हे पाहून मुलगा भारावून गेला आहे.

व्हायरल व्हिडीओत स्पर्शाने एकमेकांना ओळखण्याचा खेळ सुरु आहे. आईसमोर तीन मुलांना उभे करण्यात आलेले असते. आईच्या डोळ्यावर पट्टी असते आणि तिला स्पर्शाने आपल्या लेकाला ओळखायचे असते. तर एकेक करून ती दोन्ही मुलांना स्पर्श करते आणि आपलं मुलं आहे का हे ओळखण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान आईचा मुलाला भीती असते की, आपली आई आपल्याला ओळखू शकेल की नाही. पण, नंतर आईच्या आपल्या मुलाकडे वळते आणि त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागते.

व्हिडीओ पाहून खरंच डोळ्यांत पाणी आलं (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आई आपल्या मुलाच्या केसांवरून अनेकदा हात फिरवते. त्यानंतर त्याच्या शरीराला आणि हाताला सुद्धा स्पर्श करते. सगळ्यात शेवटी ती लेकाचा नाक पकडते आणि तिथे तिला हे आपलंच मुलं आहे याची खात्री होऊन जाते. त्यानंतर ती डोळ्याची पट्टी न काढताच स्वतःच्या मुलाला मिठी मारते. आईने आपल्याला स्पर्श करून ओळखले हे पाहून मुलगा भारावून जातो आणि रडण्यास सुरुवात करतो आणि आईच्या चेहऱ्यावर एक अनोखं स्मित हास्य दिसते.

व्हिडीओ नक्की बघा….

View this post on Instagram

A post shared by Aurivy (@aurivyen)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aurivyen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आईने फक्त स्पर्शाने आपल्याला ओळखले हे पाहून लेक भावूक झाला’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “तिने ज्याप्रकारे नाक ओढले हे पाहून बरे वाटले”, “तो यादरम्यान शांतपणे उभा राहून फक्त आईला बघत होता”, “व्हिडीओ पाहून खरंच डोळ्यांत पाणी आलं” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत…