सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही घटना क्षणात लोकांच्या भावना पेटवतात आणि त्या मोठ्या चर्चेचा विषय बनतात. अशाच एका व्हिडीओमुळे सध्या नागरिकांमध्ये संताप, नाराजी आणि प्रश्न निर्माण झाले आहे. मुलांचे वर्तन, पालकांची जबाबदारी आणि संस्कार नेमके कुठे कमी पडतात- घरात की शाळेत यावर पुन्हा एकदा जोरदार वाद सुरू झाला आहे.
अशातच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओत शाळेच्या गणवेशातील एक लहान मुलगी मुद्दाम घरासमोरील रांगोळी पुसताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत एक प्रौढ महिला असून, ती तिला तसे करण्यापासून थांबवण्याऐवजी शांतपणे उभी असल्याचे दिसते. या दृश्यामुळे अनेक नागरिक संतप्त झाले असून, “संस्कार शाळेतून नाही, तर घरातून मिळतात” अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ एका वस्तीतील घराबाहेर काढलेल्या रांगोळीचा आहे. सण किंवा विशेष प्रसंगी घरासमोर काढली जाणारी रांगोळी ही केवळ सजावट नसून, त्यामागे मेहनत, संस्कृती आहे असे मानल जाते . मात्र या व्हिडीओत ती रांगोळी पायाने पुसली जात असल्याचं स्पष्टपणे दिसतं. मात्र, या व्हिडीओत शाळेच्या गणवेशात असलेली एक लहान मुलगी पायानं रांगोळी पुसत असल्याचं स्पष्टपणे दिसतं.
पाहा व्हिडीओ
त्या मुलीजवळच एक महिला उभी असून, ती रस्ता अडवून उभी राहिल्याचा आरोप काही युजर्स करीत आहेत. ही महिला मुलीची आई असल्याचा अंदाज अनेकांनी लावला असला तरी याबाबत कोणताही पुरावा नाही. सर्वांत जास्त संताप याच गोष्टीचा आहे की, त्या महिलेनं मुलीला थांबवलं नाही. या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी पालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
एका युजरनं लिहिलं, “शाळेचा उपयोग नाही; संस्कार घरातूनच मिळायला हवेत.” तर दुसऱ्याचं म्हणणं होतं, “आपली शिक्षणपद्धती केवळ मार्क्स आणि रँकिंगपुरती मर्यादित आहे; ती माणुसकी शिकवत नाही.” “रस्ता सार्वजनिक आहे. मुलं खेळता खेळता रंगांवर पाय ठेवू शकतात. इतकीच रांगोळी महत्त्वाची असेल, तर घरात काढा,” अशीही प्रतिक्रिया दिसून आली. “फक्त बुरखा घातलाय म्हणून ती महिला आईच आहे किंवा मुद्दाम असं केलंय, असं म्हणणं चुकीचं आहे,” असंही अनेकांनी म्हटलं आहे.
