Video Shows Students Dance On Fevicol Se Song : शाळेत जायला कंटाळा आला म्हणून दांडी मारणारे विद्यार्थी आता बरे वाटत नसले तरीही बॅग घेऊन ऑफिसला जातात. जबाबदारीचे ओझे अंगावर येऊ लागल्यावर आता सगळ्यांनाच शाळेतील मजा-मस्तीचे दिवस पुन्हा जगावेसे वाटतात. तुम्हाला आठवत असेल शाळेतला पहिला आणि शेवटचा दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी हा आणतोच. कारण येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात खेळ, विविध प्रकल्प, सहली आणि सगळ्यांचा आवडता डान्सचा समावेश असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) शाळेच्या वार्षिकोत्सवादरम्यानचा आहे. ‘दबंग-२’ या चित्रपटातील करिना कपूरचे ‘फेव्हिकॉल से’ तुम्ही नक्कीच ऐकले असेल; तर आज या गाण्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी जबरदस्त डान्स केला आहे. ‘फेव्हिकॉल से’ हे आयटम साँग आहे, पण विद्यार्थ्यांनी या गाण्याला एक अस्सल देशी टच (स्पर्श) दिला आहे. पांढरा सदरा, जीन्स, टोपी आणि गळ्यात लाल स्कार्फ घालून विद्यार्थी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Parent Came Up With A Unique Jugaad To Find Their Missing Kids At The Maha Kumbh Mela Video
VIDEO: कुभंमेळ्यात लहान मुलं हरवू नये म्हणून पालकांनी केला भन्नाट जुगाड; कपड्यांवर लावलं असं पोस्टर की वाचून पोट धरुन हसाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Male teacher hug female student obscene video school student teacher viral video
“अरे तुझ्या मुलीसारखी ना ती?”, एकट्या विद्यार्थीनीला पाहून शिक्षकाने मारली मिठी अन्…, शाळेतील धक्कादायक VIDEO व्हायरल
students and teacher gave each other a special gift
VIDEO : ‘मॅडम ही रील करायला तयार झाल्या…’ शाळेच्या शेवटच्या दिवशी ‘त्यांनी’ एकमेकांना दिलं खास गिफ्ट; भावूक झाले विद्यार्थी
Teacher surprise class XII students
१२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेने दिला खास निरोप; डोळ्यांत पाणी आणेल इतका सुंदर क्षण; VIDEO चा चुकूनही चुकवू नका शेवट
Prank Call Viral Video
‘आईशप्पश.. हाच तो, मुलीचा आवाज काढून मुलांना फसवणारा मुलगा…’ अनोळखी पुरुषाबरोबरच्या गप्पा ऐकून हसाल पोट धरून; पाहा मजेशीर VIDEO
Shocking video of two female students did weird act in government school viral video on social media
अचानक वर्गातून उड्या मारल्या आणि मैदानात लोळू लागल्या, सरकारी शाळेत विद्यार्थीनींचं विचित्र कृत्य! VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Parents congratulated their children for not coming home on time
‘पप्पा, मला माफ करा…’ मुलं वेळेवर घरी आली नाहीत म्हणून आई-वडिलांनी केला सत्कार… VIDEO पाहून येईल हसू

हेही वाचा…‘चंद्रा’ गाण्यावर चिमुकलींची जुगलबंदी! ठसकेबाज लावणीला बीट बॉक्सिंगची साथ; VIDEO पाहून अमृता खानविलकरची कमेंट, म्हणाली…

व्हिडीओ नक्की बघा…

लहानपणी लग्नाच्या वरातीत, गणपतीच्या मिरवणुकीत तर शाळेत वार्षिकोत्सवात बेभान नाचणे आपल्यातील प्रत्येकाला आवडायचे. एकदा हे वय निघून गेले की वेळही नसतो आणि नाचण्याची सवयही काही जणांची सुटून जाते, त्यामुळे असे मजा-मस्ती करत नाचण्याचे दिवस वाढत्या वयानुसार एक आठवण बनून जातात; तर शाळेत वार्षिकोत्सवाला गेलेल्या एका अज्ञात व्यक्तीने विद्यार्थ्यांना मजा-मस्ती करत नाचताना पहिले आणि हा व्हिडीओ स्वतःच्या मोबाइलमध्ये कॅप्चर करून घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

हे सुख अनुभवता येतं नाही…

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ (Video) @gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एकदा वय निघून गेल्यावर हे सुख अनुभवता येतं नाही’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनासुद्धा त्यांच्या शाळेचे दिवस आठवले आहेत आणि त्यांनी मुलांच्या डान्सचे भरभरून कौतुकसुद्धा केले आहे. ‘नाद नाही करायचा जिल्हा परिषद शाळेचा, खूप छान, शाब्बास’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.

Story img Loader