viral video technician Control Brightness Using Fan Regulator : भारतीयांचे जुगाड हे जगभरात प्रसिद्ध आहेत. जिथे विचार थांबतात तिथून आपल्याकडची जुगाडू मंडळी विचार करायला सुरु करतात. व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांचे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात. काही वेळा तर ही क्रिएटिव्हिटी पाहून ही माणसं एवढी हुशारी कुठून घेऊन येतात असा प्रश्नच पडतो. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये पंखा नाही चक्क लाईटचा प्रकाश कमी जास्त करण्यासाठी जुगाड करण्यात आला आहे.

तुमच्याकडे महागडी किंवा आधुनिक साधने नसली तरी, फक्त थोडे ज्ञान आणि डोकं लावून तुम्ही घरातील साध्या वस्तूंनाही नव्या पद्धतीने वापरु शकता. याचे उत्तम उदाहरण हा व्हिडीओ घेऊन आला आहे. एक साधा फॅन रेग्युलेटर, जो सामान्यतः पंख्याचा वेग कमी-जास्त करण्यासाठी वापरला जातो. त्याला आज वेगळाच ट्विस्ट देण्यात आला आहे. एका माणसाने हा रेग्युलेटर एलईडी लाईटला जोडून त्याची ब्राइटनेस (प्रकाशाची तीव्रता) कमी-जास्त करण्यासाठी वापरला आहे. यामुळे लाईटचाही प्रकाश रेग्युलेटरद्वारे नियंत्रित करता येतो.

वाह काय जुगाड आहे (Viral Video)

पंख्याची हवा ज्याप्रकारे कमी-जास्त केली जाते अगदी त्याचप्रमाणे लाईटची ब्राइटनेस कमी जास्त करताना महिला दिसते आहे. अगदी पंख्याची हवा कमी होते तसंच अगदी लाईटचा प्रकाश सुद्धा अगदी कमी होताना दिसतो आहे; जो अगदी बघण्याजोगा आहे. कधी कधी खूप जास्त प्रकाश असेल तर आपल्या सगळ्यांची चिडचिड होते. त्यामुळे कामानुसार लाईटचा प्रकाश कमी-जास्त करण्यासाठी अगदी जबरदस्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_trendwave1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये “रेग्युलेटर वापरून लाईटची ब्राइटनेस केली कमी”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून “हे आम्ही आधीच करून झालो आहे”, “यामध्ये काय कौतुक करण्यासारखं आहे”, “वाह ताई वाह काय जुगाड आहे”, “मस्त जुगाड आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…