Ghungroo Making Video :लहानपणी पायांत पैंजण घालण्याची आवड प्रत्येक चिमुकलीला होती. आता हळूहळू या छमछम वाजणाऱ्या पैंजणांची जागा मॉडर्न अँकलेटने घेतली आहे. पण, या सगळ्यात पायांत घातल्यावर छान दिसणाऱ्या, नृत्यात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या 'घुंगरांचे' स्थान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. भरतनाट्यम, कथक आदी बऱ्याच पारंपरिक नृत्यांमध्ये घुंगरू पायांत घालून नृत्य सादर केले जाते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, गाण्यावर थिरकणाऱ्या, पायांची शोभा वाढवणाऱ्या, रसिक प्रेक्षकांना आकर्षित करणारे घुंगरू कसे तयार होतात? तर आज याचसंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही घुंगरू मोल्ड धातूपासून बनवले जातात, जसे की पितळ. तर व्हिडीओच्या सुरुवातीला कामगार पक्कडच्या साह्याने गरम पाण्यातून पितळ काढताना दिसत आहेत. त्यानंतर मेटल स्टॅम्पिंग साच्याचा वापर करून धातू गोलाकार करण्यासाठी तो साचा एका बॉक्समध्ये ठेवला आहे आणि त्यावरून काळी माती टाकली आहे. त्यानंतर वितळवलेले पितळ बॉक्सच्या होलमधून साच्यात ओतले आहे. त्यानंतर साच्यातून धातू बाजूला काढून, त्यात घुंगरूंना होल केले आहेत आणि त्यात मणी टाकले आहेत. कशा प्रकारे बनवले जात आहेत घुंगरू ते व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) एकदा पाहाच. हेही वाचा…मालक नाही मित्र…! श्वान पावसात भिजू नये म्हणून आजोबांचा जुगाड; प्लास्टिकच्या पिशवीनं झाकलं, टोपी घातली अन्… पाहा VIDEO व्हिडीओ नक्की बघा… ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर : व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, साच्याच्या साह्याने घुंगरू बनवून घेतले आहेत. पक्कडच्या साह्याने घुंगरू वेगळे करून, त्यात मणीसुद्धा टाकले आहेत. अशा प्रकारे पुरुष कामगारांनी घुंगरू तयार ठेवले आहेत आणि अंतिम कार्यासाठी (फायनल टच) ते महिला कामगारांकडे सोपवले आहेत. त्यानंतर महिला कामगार ते घुंगरू चामड्याच्या किंवा कापडाच्या पट्ट्यावर लावून घेत आहेत. त्यासाठी तिने सुई-धागा, फेविकॉलची मदत घेतली आहे आणि अशा प्रकारे पायांत घालायचे हे सुंदर घुंगरू तयार झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodbowlss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला 'घुंगरू प्राचीन पद्धत वापरून बनवले जातात', अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून घुंगरू बनविण्याच्या पद्धतीचे कौतुक करीत आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मांडताना दिसत आहेत. आतापर्यंत आपण सगळ्यांनी घुंगरू पहिले आहेत. पण, ते कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने बनवले जातात हे आपल्यातील अनेकांनी आज पहिल्यांदा पाहिले असेल.