Viral Video Of Dhoni & Kohli : क्रिकेट आणि चाहत्यांचं नातं काहीतरी खास आहे. जिथे क्रिकेटपटू मैदानात असतात, तिथेच त्यांच्या चाहत्यांच्या मनात नेहमी त्यांच्या प्रतिमा राहतात. कधी कधी ही प्रतिमा इतकी जिवंत वाटते की, रस्त्यावरून चालताना किंवा कुठेतरी अचानक दिसली की, त्यांना खूप आनंद होतो. सोशल मीडियावर आता असाच एक छोटा क्षण लोकांच्या हृदयाला भिडत आहे आणि त्यातून चाहत्यांना जुन्या क्रिकेटच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

क्रिकेटचे चाहते आणि सोशल मीडियावर मजा करणारे लोक सध्या एका भन्नाट व्हायरल व्हिडीओवर हसून खुश होत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही वेळा लोकांना खरे एम. एस. धोनी आणि विराट कोहली रस्त्यावर बाईकवर जाताना दिसत आहेत, असं वाटलं. पण, खरोखरच हे दोघे क्रिकेटपटू नव्हते; तर त्यांचे त्यांच्यासारखी दिसणारी काही तरुण मंडळी होती. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये खूपच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

रस्त्यावर एक माणूस ट्रॅफिक सिग्नलवर थांबतो आणि विराट कोहलीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो. तो विचारतो, “अरे, हा खरा विराट आहे का?” तर विराटसारखा दिसणारा तरुण म्हणतो की, धोनीपण आहे. त्यावर शूट करणारे म्हणतात, “अरे, धोनीपण आहे का? हा क्षण पाहून सगळीकडे हसू पसरलं. धोनीसारखा दिसणारा माणूस त्याच्या शांत आणि गप्प राहणाऱ्या स्वभावामुळे खऱ्या धोनीची आठवण करून देतो.”

सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरनं लिहिलं, “विराट कोहली ६०%, एमएस धोनी ९०%!” तर दुसऱ्यानं गमतीमध्ये म्हटलं, “दोन्ही सरोजिनी मार्केटवरून आले आहेत.” काहींनी नावांमध्ये मजा करीत, “किरात व्होहली आणि एमएस सोनी” असे टॅग केले. आणखी एका युजरनं लिहिलं, “थाला फॉर हाफ रीझन.” काही लोक म्हणाले, “विराट आणि एमएस मीशोवरून आलेत” हे सर्व पाहून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ पाहून खूप हसत आहेत.