Video Shows Couple Sitting In Auto Rikshaw : जोडीदार कसा असावा, असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही पहिली गोष्ट नक्की काय सांगाल? आपसूकच पैसे, नोकरी, घर हे सोडून आपण समजून घेणारा आणि चांगला स्वभाव असणारा, असे सहज म्हणून जातो. कारण- चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीबरोबरच आपण आयुष्य अगदी आरामात घालवू शकतो. कितीही चढ-उतार आले तरी तुम्ही त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहात हे नेहमी जाणवून देणारी व्यक्तीच योग्य जोडीदार असू शकते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ एका जोडप्याचा आहे. काही रिक्षाच्या डिकीमध्येसुद्धा बसायला जागा असते. तिथेच हे जोडपे रिक्षाबाहेर पाय ठेवून अगदी आरामात बसलेले दिसते आहे. तरुणीच्या हातात एक श्वानाचे पिल्लू असते. त्याला अलगद पकडून ती आपल्या जोडीदाराबरोबर मनापासून गप्पा मारताना दिसते आहे. एवढेच नाही, तर तिचा जोडीदारसुद्धा अगदी शांतपणे तिचे बोलणे न कंटाळता ऐकतो आहे; जे पाहून आपल्याही नशिबात असा एखादा जोडीदार असावा, अशी इच्छा प्रत्येक जण व्यक्त करताना दिसतो आहे.
तो ज्याप्रकारे तीच ऐकतो आहे बघून भारी वाटले… (Viral Video)
एरवी रस्त्यात जोडप्याचा रोमान्स पहिला की, अनेकदा यांना काय शिस्त नाही, असे आपण अगदी सहज म्हणून जातो. पण, व्हायरल व्हिडीओतील जोडप्याचा गोड क्षण पाहून आपल्याबाबतही असं काही घडावं, अशी आशा तुम्ही नक्कीच मनात आणाल. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, प्रवासादरम्यान कार चालवणाऱ्या व्यक्तीला रिक्षात बसलेल्या एकमेकांशी निवांतपणे बोलणाऱ्या जोडप्याचा सुंदर क्षण भरपूर आवडला आणि त्याने आपल्या मोबाईलमध्ये तो क्षण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_oceyanic101 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आयुष्यात पैसे नाही, तर अशा शांतीची गरज आहे’, ‘तिला प्रेमाने ठेवलंस तर ती कुठेच नाही जाणार’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा या जोडप्याला पाहून प्रेमात पडले आहेत आणि “तो ज्या प्रकारे तिचं ऐकतो आहे बघून भारी वाटले”, “दोघांना कोणाची नजर नको लागू देत”, ‘यालाच खरं प्रेम म्हणतात’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.