Rainbow Viral Video : पावसानंतर पावसाइतकंच आल्हाददायक काही असेल तर ते असतं इंद्रधनुष्य. सात रंगामध्ये प्रकाशाचा होणारा खेळ हरेकाच्या नजरेला बांधून ठेवतो. अगदी काही क्षणच दिसलं तरी इंद्रधनुष्य अद्भुत आनंद देऊन जातं. हे इंद्रधनुष्य पावसात, पाऊस पडून गेल्यावर कधीही, कुठंही दिसू शकतं. आकाशात अनेकदा अर्धवर्तुळाकार सप्तरंगी पट्ट्याचा इंद्रधनुष्यही तुम्ही पाहिल असेल ना? शब्दात वर्णन न करता येणाऱ्या या दृश्‍यावर अनेकांनी कविता केल्या आहेत. अनेकांनी आपापल्या पद्धतीने मांडण्याचाही प्रयत्न केला आहे. पण हे इंद्रधनुष्य उंच आकाशातून कसं दिसत असेल? हे जाणून घेण्याची तुम्हाला कधी तरी इच्छा झाली असेल. मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाशातून इंद्रधनुष्याचे चित्तथरारक दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. निसर्गाच्या या सात रंगानी पृथ्वी सुंदर केलेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावसाळ्यात इंद्रधनुष्याची वाट पाहत असतात. आकाशातून दिसणारे इंद्रधनुष्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला स्कायडायव्हिंग करताना दिसत आहे. हवेत तरंगताना उंच आकाशातून तिला इंद्रधनुष दिसून येतं. यावेळी महिला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून हे सुंदर आणि मनमोहक इंद्रधनुष्य कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. लाल आणि आतील बाजूस जांभळा रंग असलेलं हे इंद्रधनुष पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं.

आणखी वाचा : ऑस्ट्रेलियात १४ व्हेल माशांचा गूढ मृत्यू? ज्यांची उलटी ३० लाखात विकली जाते, कारण जाणून घ्या

हा व्हिडीओ आणखी तुम्ही निरखून पाहिला तर आणखी वेगळ्या रंगांसह एक अस्पष्ट रिंग देखील दिसू शकते. असे इंद्रधनुष्य खूप कमी प्रमाणात दिसून येतात. सात रंगांनी बनलेले इंद्रधनुष्य आपल्याला आकर्षून घेतात.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वाघ जेव्हा भडकलेल्या वाघिणीसमोर उंदरासारखा होतो तेव्हा…

हा व्हिडीओ रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नसल्याने तो वारंवार पाहण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९९ हजार अपवोट्स मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

इंद्रधनुष्य एका विशिष्ट वातावरणीय अवस्थेत बनतं. (अर्थातच पाऊस आणि सूर्यप्रकाश मिसळून) सूर्य क्षितिजावर ४० डिग्री कोनाच्या आत झुकलेला असला पाहिजे. सूर्य जितका वर जाईल तितकं इंद्रधनुष्य खाली जातं. सूर्य जसजसा पूर्वेकडे झुकत जाईल तशी दिशा महत्त्वाची बनत जाते. आणि हीच समान परिस्थिती सूर्य दुपारी पश्चिमेकडे झुकताना महत्त्वाची बनते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows what rainbow looks like from air prp
First published on: 25-09-2022 at 14:01 IST