Video Shows Cop Slapped Girl At checkpoint : उत्तराखंडच्या नैनिताल येथे रोड ट्रिपवर गेलेल्या दिल्लीतील यती शर्मा या महिलेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. नैनितालच्या रामगड परिसरातून गाडी चालवत असताना पोलीस अधिकाऱ्याने तिच्या मैत्रिणीबरोबर गैरवर्तन केले. तिला आणि तिच्या मैत्रिणीला एका चौकीवर कोणतेही कारण नसताना थांबविण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली आणि सर्व आवश्यक कागदपत्रे दाखवूनही अधिकाऱ्याने तिच्या कानशिलात लगावली. तिचा अर्धा चेहरा सुजला आहे, असा दावा महिला करताना दिसते आहे.

गुलाब सिंग कंबोज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसाने जेव्हा महिला ही घटना रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करीत होती तेव्हा अधिकाऱ्याने तिचा फोन फेकून दिल्याचा आरोपही केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांनी तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आणि एक निवेदनसुद्धा जारी केले आहे. या घटनेच्या उत्तरात नैनिताल पोलिसांनी दावा केला की, महिलेच्या दुचाकीवर नंबर प्लेट व नोंदणीची कागदपत्रे नव्हती आणि मागे बसलेल्या मैत्रिणीने हेल्मेट घातले नव्हते.

पण, महिलेने हा दावा फेटाळून लावला. महिलेने आणखीन एक व्हिडीओ पोस्ट करून दुचाकीवरील दोन पुरुषांपैकी एकानेच हेल्मेट घातले होते. मग त्यांना का थांबवण्यात आले नाही, असा जाब विचारला आहे. तसेच महिला व तिच्या मैत्रिणींनी हेल्मेट घातलेले आणि वाहनाची वैध कागदपत्रे व्हिडीओत दिसत आहेत. त्यामुळे तिने पोलिसांच्या या विधानाला खोटे ठरवीत जबाबदारी टाळण्यासाठी हे पांघरूण घालण्याचे काम असल्याचे म्हटले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

चौकशीच्या निष्कर्षांवर पुढील कारवाई होणार (Viral Video)

नैनिताल पोलिसांनी नंतर एक निवेदन जारी करून चौकशीचे आदेश देण्यात आल्याची पुष्टी केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, “सोशल मीडियावर वाहन चालानशी संबंधित व्हायरल झालेला व्हिडीओ चौकी रामगड भागातील आहे, जिथे चौकी प्रभारी यू. एन. गुलाब कंबोज यांनी तपासणीदरम्यान नंबर प्लेट नसलेली दुचाकी थांबवली. वाहनाची नोंदणीसंबंधीची कागदपत्रे नव्हती आणि मागे बसलेल्याने हेल्मेट घातले नव्हते. चालक आणि पोलिस यांच्यात वाद झाला, ज्याचा व्हिडीओ चालकाने सोशल मीडियावर शेअर केला. चौकशीच्या निष्कर्षांवर पुढील कारवाई अवलंबून असेल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @yati._.sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंडच्या नैनिताल येथील अनेक रहिवासी महिला आणि तिच्या मैत्रिणीची माफी मागताना दिसत आहेत आणि या प्रसंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतलेले दिसते आहे.