Women Shared Video Of Diet Plan Created By ChatGPT : चॅटजीपीटी (ChatGPT) वर एक एखादा प्रश्न विचारलात तर तुम्हाला त्याची हजारो उत्तर तुम्हाला सापडतील. म्हणून एखादी महत्वाची माहिती शोधण्यापासून ते भावना शेअर करण्यापर्यंत अनेक जण चॅटजीपीटीवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. तर आज एका कन्टेन्ट क्रिएटरने तर चक्क चॅटजीपीटीच्या मदतीने ५ किलो वजन कमी केले आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला एकही रुपया खर्च करावा लागला नाही .
कन्टेन्ट क्रिएटरला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) चा त्रास असतो. यामुळे पोटफुगी, तहान, कमी ऊर्जा आणि चरबी जी निघून जात नव्हती. मग यासाठी तिने चॅटजीपीटीकडे धाव घेतली. यामध्ये चॅटजीपीटीने तिच्या शरीरानुसार आहार आणि फिटनेससाठी दिनचर्या करण्यास मदत केली याबद्दल व्हिडीओत सांगितले आणि इतरांना त्यांच्या स्वतःच्या गरजांनुसार ते बदलण्यास आणि वैयक्तिकृत करण्यास प्रोत्साहित सुद्धा केले.
कन्टेन्ट क्रिएटरने चॅटजीपीटीची चॅट करण्यास सुरुवात केली. तिने पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास असल्याचे सांगून स्वतःचे नाव, वय,उंची आणि वजन सांगितले. तसेच चरबी कमी करण्यासाठी आणि स्नायू तयार करण्यासाठी आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करते असे सुद्धा नमूद केले. चिकन, अंडी, तुळशीच्या बिया, सॅलड आणि ताक पिते आणि दुग्धजन्य पदार्थ आणि ग्लूटेन टाळते. त्यामुळे आठवडाभराचा डाएट प्लॅन सांगा असे कन्टेन्ट क्रिएटर चॅटजीपीटीला म्हणाली.
व्हिडीओ नक्की बघा…
मग चॅटजीपीटीने कन्टेन्ट क्रिएटरसाठी ४० दिवसांचा वर्कआउट आणि जेवणासाठी प्लॅन तयार करून दिला. या प्लॅनमध्ये तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही. फक्त सातत्य, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवून वर्कआउट करणे गरजेचे होते. या ४० दिवसात कन्टेन्ट क्रिएटरला केव्हा केव्हा वर्कआउट करावंसं वाटतं नव्हते. पण, तेव्हा कन्टेन्ट क्रिएटरने स्वतःला आठवण करून केल्या की यापेक्षाही कठीण गोष्टी तिने केल्या आहेत. त्यामुळे ही गोष्ट तर तिच्यासाठी काहीच नाही. चॅटजीपीटीने सांगितल्यानंतर कन्टेन्ट क्रिएटरने एकही वर्कआउट चुकवला नाही, कोणताही शॉर्टकट वापरला नाही आणि डाएट प्लॅनवर ठाम राहिले. त्यामुळे कन्टेन्ट क्रिएटरने फक्त ५ किलो वजन कमी केले नाही तर शिस्त, मेहनत आणि स्वतःवरील विश्वास मिळवला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ninisvanitybox या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये कन्टेन्ट क्रिएटरने वजन कमी करण्याची सर्व प्रोसेस कॅप्शनमध्ये नमूद केली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा चॅटजीपीटीचे आणि महिलेच्या मेहनतीचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसत आहेत.