Viral Video Shows Zebra Escaped From His New Home : नातेवाईक, मित्र-मंडळी किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर काही दिवसातच पुन्हा आपल्या घरी जाण्याची इच्छा होते. नवीन वातावरणात, नवीन घरात, नवीन जागी राहणे अनेकांना जमत नाही; असे अनेकदा आपण माणसांच्या बाबतीत होताना पाहिले असेल. पण, आज एका व्हिडीओत चक्क एक प्राणी नवीन घरात जाताच एका दिवसात पळून गेला आणि त्याची अगदी नाट्यमय पद्धतीने घरवापसीसुद्धा झाली आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओ अमेरिकेतील आहे. ३० मे २०२५ रोजी झेब्र्याच्या मालकाने त्याला विकत घेतले होते. त्यानंतर ३१ मे रोजी झेब्रा मालक आपल्या झेब्र्याला घेऊन घरी घेऊन आला. पण, अमेरिकेतील रदरफोर्ड काउंटीमध्ये आल्यानंतर म्हणजेच त्याच्या नवीन घरी आल्यानंतर फक्त एकाच दिवसात झेब्रा जंगलात पळून गेला. मग आठवडाभर झेब्राला शोधण्याचा प्रवास सुरू झाला आणि या गोष्टीचा शेवट अगदी नाट्यमय झाला.
झेब्र्याची एअर लिफ्टने घरवापसी (Viral Video)
रदरफोर्ड काउंटी शेरीफ कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, ३१ मे रोजी झेब्र्याला घरी आणल्यानंतर केवळ २४ तास झेब्रा बेपत्ता झाला. त्यामुळे तक्रार करण्यात आली होती. पुढील काही दिवसांत, झेब्रा संपूर्ण परिसरात अनेक वेळा दिसला. त्यादरम्यान त्याला पकडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, पण ते अयशस्वी ठरले. पण, रविवारी विमान कर्मचाऱ्यांनी झेब्र्याला जंगलातून सुरक्षितपणे पकडले आणि एअरलिफ्ट करून एका गाडीत ठेवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Manchh_Official या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शेरीफच्या कार्यालयातील विमान कर्मचाऱ्यांनी झेब्र्याला जंगलातून पकडले आणि जेव्हा एअरलिफ्ट करून आणत होते, तेव्हा त्याला एका जाळीत ठेवण्यात आले होते. जाळीतून डोकं वर करून तो बघत होता, तर पायसुद्धा त्याचे हवेत लटकत होते. अशाप्रकारे अगदी नाट्यमय पद्धतीने पळून गेलेल्या झेब्र्याची घरवापसी झाली असे म्हणायला हरकत नाही.