Beggar Truth Shocking Viral Video : रस्त्यावरून चालताना किंवा प्रवासादरम्यान सिग्नलवर एखादा भिकारी दिसल्यास तुम्ही स्वत: कदाचित भीक देत नसाल; पण तुमच्याबरोबरचे कुटुंबीय किंवा मित्र त्यांना नक्कीच मदत करीत असतील. यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो; पण तुम्ही कधी याबाबत विचार केला आहे का की, जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला भीक मागणारे खरंच गरजू असतात का? त्यांच्या शरीरावरील असलेल्या जखमा खऱ्याच असतात का? याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही यापुढे भिकाऱ्यांना मदत करताना १०० वेळा नाही १००० वेळा विचार कराल.
रितू जयस्वाल नावाच्या तरुणीने तिच्या घराच्या बाल्कनीतून हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत ती खाली पार्किंग लॉटवर कॅमेरा झूम करते, ज्यात काही महिला आणि मुलं दिसतायत. रितूचा दावा आहे की, त्यांच्या बनावट जखमांवर ते पट्टी बांधत होते. प्रत्यक्षात एक महिलेने एका मुलाच्या डोक्यावर पट्टी बांधली आणि त्यानंतर ती कानाला क्रीम लावताना दिसली.
तिने दावा केला की, मुलांच्या कानात औषध जाऊ नये म्हणून त्यांच्या कानात कापूस घालून औषध आणि पट्टी लावली जात होती. हे सर्व खरं वाटावं म्हणून औषधही लावलं जात आहे. यावरून हे लोकांची किती फसवणूक करतात हे समजेल. हे सर्व रितू वरून खूप वेळ पाहत होती, इतक्यात एका महिलेच्या ते लक्षात येताच ती मुलांना घेऊन तिथून निघून जाऊ लागली.
लहान मुलं निरागस असतात. ही गोष्ट भिकाऱ्यांच्या मुलांनाही लागू होते. त्यामुळे रितूने व्हिडीओ बंद केला आणी खाली जाऊन त्या मुलाला विचारले की, त्याला दुखापत झाली आहे का, तेव्हा त्याने काहीच उत्तर दिले नाही. नंतर म्हणाला की, “मला दुखापत झालेली नाही,” इतक्यात त्याची आईने उत्तर दिले की, “त्याला फोडी आली आहे.” रितूने विचारले, “त्या फोडीवर किती पट्ट्या बांधल्या आहेत?” पण या प्रश्नावर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते किंवा त्यांनी उत्तर देणं टाळलं. या घटनेवरुन रितूने इशारा दिला की, बरेलीला येणाऱ्या लोकांचे चेहरे ओळखले पाहिजेत.
हा व्हायरल व्हिडीओ sheel.j.01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर एका युजरने कमेंट केली, “या लोकांना पैसे नाही, खायला द्या.” दुसऱ्या युजरने लिहिले की, यासाठीसुद्धा खूप मेहनत लागते. आणखी एका युजरने निदर्शनास आणून दिले की, मेकअप अजूनही तसाच आहे.
