Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एक चिमुकली सुंदर लावणी करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्सचे नेटकरी खूप कौतुक करताना दिसत आहे.
लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात चक्क एक चिमुकला लावणी करताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळून झाल्यानंतर एक चिमुकला लावणी सादर करताना दिसतोय. यावेळी तो “खेळताना रंग बाई होळीचा” या गाण्यावरील लावणी करताना दिसतोय. यावेळी त्याच्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ @sanket____gomade या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडीओला दोन लाख नेटकऱ्यांनी पाहिले आहे. तसेच हजारो नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, “पोरगं लय हुशार आहे”, दुसऱ्या युजरने कमेंट केलीय की, “टांगा पलटी घोडे फरार नाचला”, तर आणखी एकानं कमेंट केली आहे की, “खूप छान नाचतो बाळा सातत्य ठेव. उद्याचा उगवता कलाकार ”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप छान खूप छान बाळा, एक नंबर,अदाकारी एक नंबर आणि छान आहे. वाह क्या बात है”
