Viral Video: आजकालच्या अनेक लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत.
डान्स, संगीत, अभिनय यांसारख्या कला क्षेत्रात आपलं नाव मोठं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सोशल मीडियावर लाखो युजर्स अशा विविध कला सादर करत असतात, ज्यातील काही मोजकेच लोक लोकप्रिय होतात. ह्या कला सादर करणाऱ्यांमध्ये अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर जबरदस्त डान्समुळे सतत चर्चेत असलेल्या चिमुकलीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.
समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. सध्या सोशल मीडियावर ‘ओ मामा’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एका चिमुकलीनं जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘ओ मामा’या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. यावेळी तिच्याबरोबर या व्हिडीओमध्ये आणखी एक तरूणीदेखील नाचताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat_arora.2 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय,“खूप क्यूट.” आणखी एकाने लिहिलेय, “सर्वात भारी केलं हिने” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर डान्स.”
