Viral Video: हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती जबरदस्त लावणी सादर करताना दिसतेय.
लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. चिमुकलीच्या लावणीसमोर भल्या भल्या लावणी कलावंतही फिक्या पडतील अशी भन्नाट लावणी तिने केली आहे.
हल्ली सतत अनेक नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात ती लावणी करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एक चिमुकली लावणी सादर करत आहे. यावेळी ती “गोऱ्या गोऱ्या टाचात काटा रुतला” या गाण्यावर अतिशय सुरेख नृत्य करतेय. शिवाय तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही पाहण्यासारखे आहेत. तिचा हा डान्स पाहून आसपास बसलेले लोकही तिच्याकडे कौतुकाने पाहत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ @durva_z_15 या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”किती गोड आहे ही” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”खूप खूप छान आरारा नादचखुळा” तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,”मोठी होऊन खूप मोठी कलाकार होणार” अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
