Viral Video: आजकालची लहान मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही सोशल मीडियावर ‘मन तुझं जलतरंग’ या कवितेच्या ओळी खूप चर्चेत आहेत. या ओळींवर लाखो तरुण, महिला साडी नेसून रील्स बनवताना दिसत आहेत. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली निळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसून ‘मन तुझं जलतरंग’, या गाण्यावर सुंदर अभिनय करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील सुंदर एक्स्प्रेशन पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या शेवटी चिमुकलीची आईदेखील हुबेहूब लेकीसारखा मराठमोळा लूक करून व्हिडीओत लेकीची साथ देताना दिसत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lil.singer.riya या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप खूप जास्त सुंदर दिसते आहे तू”, दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप सुंदर रिया बाळा”, तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “गोंडस बाळ”, तर आणखी एकाने लिहिलेय की, “एक नंबर एक्स्प्रेशन्स.”