Viral Video: सध्या पावसाळा सुरू झाला आहे. सगळीकडे निसर्गरम्य वातावरणही आहे. अनेकांना पावसाळ्याचा हंगाम आणि त्यात भिजायला खूप आवडते. सोशल मीडियावरही पावसात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एका चिमुकलीचा पावसात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती चिमुकली पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसतेय.
हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिमझिम पाऊस सुरू असून, एक चिमुकली या पावसात भिजत भिजत सुंदर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ivanshika_prathyush या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १५ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स.” आणखी एकाने लिहिलेय, “मला माझं बालपण आठवलं.” तर, एकाने लिहिलेय, “खूप क्यूट.”