Ganeshotsav Viral Video: समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ सातत्याने चर्चेत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात, तर काही आपला थरकाप उडवतात, तर काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता काही चिमुकल्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

गणेशोत्सवाबद्दल मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्येही खूप उत्सुकता असते. आरतीसाठी, प्रसाद वाटण्यासाठी, तर कधी भजनी मंडळाबरोबर रात्रभर जागण्यासाठीही लहान मुलं नेहमी तयार असतात. अनेक लहान मुलं बाप्पाच्या विसर्जनादरम्यान भावूकही होतात. दरम्यान, आता असा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात काही लहान मुलं मिळून स्वतःचा गणेशोत्सव साजरा करीत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गावातील काही लहान मुलं एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यावेळी त्यातील एका मुलानं त्याच्या सायकलच्या मागच्या सीटवर फळी ठेवून गणपती बाप्पाची हातांनी बनवलेली मूर्ती ठेवल्याचं दिसत आहे. त्याशिवाय या मूर्तीला फुलं, दूर्वा वाहण्यात आल्या आहेत. तसेच बाजूला ध्वनिवर्धक लावून, त्यावरील गाण्यांवर इतर मुलं नाचत आहेत. या चिमुकल्यांचा हा गोड गणेशोत्सव खूप चर्चेत आहे.

हेही वाचा: “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” गुलाल अन् सासनकाठीसह बाप्पाच्या सजावटीमध्ये कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेचा नयनरम्य देखावा; VIDEO पाहून नेटकरी अवाक्

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nanu_oba_raytana_hendathi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं लिहिलंय, “आपल्याला या मुलांकडून शिकायला हवं, सण पैशांनी नाही; तर आनंदानं साजरा केला जातो.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “माझ्या लहानपणीचे दिवस आठवले.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “एकदम जबरदस्त भाऊ.” आणखी एकानं लिहिलंय, “प्रेम आणि चांगली भावना यापेक्षा आयुष्यात काहीच मोठं नाही.”