Viral Video: दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असतील. पण या तरुणीच्या डान्सने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता दोन मुलींचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुली रिमिक्स हिंदी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत आहे. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि सुंदर डान्स स्टेप्स देखील पाहण्यासारखे आहेत. तिचा हा डान्स पाहून तिच्या आसपास उभे असलेले लोक तिच्याकडे कौतुकाने पाहून तिला दाद देत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Pratima Pande (@pratima403856)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pratima403856 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या असून, अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “अहा, काय नाचला राव”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “असा डान्स आजवर कधीच पाहिला नसेल”, तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच भारी”.