Snake Viral Video: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावरही यादरम्यानचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती, डेकोरेशन, गाणी, डान्स यांसारख्या चांगल्या गोष्टींसह लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये भाविकांबरोबर केले जाणारे गैरवर्तन, भांडण या वाईट गोष्टीही खूप चर्चेत आहेत. याचदरम्यान आता सांगलीतील एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आजपर्यंत तुम्ही अनेक मंदिरांमध्ये नागाला मंदिरातील मूर्तीजवळ गेल्याचे पाहिले असेल. आताही असाच एक नाग चक्क बाप्पाला भेटण्यासाठी आल्याचे दिसत आहे. खरं तर हिंदू धर्मामध्ये नागाला पूजनीय मानले जाते, त्यामुळेच श्रावणात आपण नागपंचमी हा सणदेखील साजरा करतो. आतापर्यंत तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल की, नागपंचमीला पूर्वी घरोघरी सांगलीतील बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा केली जायची. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बत्तीस शिराळ्यातील असून यावेळी एक नाग बाप्पाच्या भेटीला आल्याचे दिसत आहे.

नागोबा आला बाप्पाच्या भेटीला

आतापर्यंत बऱ्याचदा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिव मंदिरांमधील पिंडीवर खऱ्या नागाला वेढा घालून बसलेलं तुम्ही पाहिलं असेल. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता, एका मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचे दिसत आहे. यावेळी तो नाग बाप्पाच्या मूर्तीवर चढतो आणि नंतर बाप्पाच्या गळ्यात वेढा घालून बसतो. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @PrathamWaidande या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

हेही वाचा: ‘गावरान तडका…’ शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी धरला हलगीच्या तालावर ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरातील हलगी डान्स…”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीही सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले होते, ज्यातील एका व्हिडीओमध्ये एक श्वान बाप्पाच्या विसर्जनामुळे भावूक झाल्याचे दिसले होते. श्वानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता; तर आणखी एका व्हिडीओमध्ये बाप्पाची आरती सुरू असताना मांजर शांतपणे बसून आरतीचा आनंद घेताना दिसली होती.