son surprised his father with new phone viral video : वडील म्हणजे कोणत्याही इच्छेला कधीच नाही न म्हणणारी दिलदार व्यक्ती. एक घास कमी खाईल; पण तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाईल. स्वतः फटाके, जुने कपडे घालणार; पण सणाला तुम्हाला नवीनच कपडे घेऊन देणार. बाप-लेकाचं नातं थोडं अबोल असतं. पण, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओनं मात्र त्या अबोल नात्याला शब्द दिले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
वाराणसी येथील ‘आयआयटी बीएचयू मधील’मध्ये शिकणाऱ्या अभिनंदन गायकवाड या विद्यार्थ्याने बाबांना खूप छान भेटवस्तू दिली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला (लेक) मोबाईलच्या दुकानात जाताना दिसतो. विविध फोन काळजीपूर्वक पाहिल्यानंतर शेवटी तो वनप्लसचा फोन घेण्याचे ठरवतो. त्यानंतर तो वडिलांसमोर शॉपिंग बॅग आणून ठेवतो. वडिलांना याबाबत काहीच कल्पना नसते. त्यामुळे ते थोडेसे गोंधळल्यासारखे वाटतात. वडील हळूच ती व्यवस्थित पॅक केलेली भेटवस्तू बाहेर काढतात आणि उघडून बघतात. त्यात एक नवीन मोबाईल फोन आहे हे लक्षात येताच, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात आणि त्यांच्या ओठांवर निखळ हास्य उमटते आणि शेवटी त्यांनी हात मिळवून लेकाला थँक यू देखील म्हंटले आहे.
हा केवळ फोनचा विषय नव्हता… (Viral Video)
या भेटीमागील कारण स्पष्ट करताना, अभिनंदनने कॅप्शन लिहिली, “२०२१ मध्ये इयत्ता १०वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर, त्याने वडिलांकडे मोबाईल फोनची मागणी केली होती आणि कोणताही विचार न करता, मला फोन घेऊन दिला होता. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाच्या पहिल्या वर्षात असताना त्याने ‘iPhone 14’ची मागणी केली होती आणि पुन्हा एकदा बाबांनी माझी इच्छा पूर्ण केली होती. माझ्या इच्छांना त्यांनी कधीच ‘नाही’ म्हटले नाही. अगदी जेव्हा मला माहीत होते की, त्यांच्यासाठी ते करणे सोपे नव्हते, तेव्हाही. त्यामुळे आता माझी वेळ आहे. ज्या व्यक्तीने मला सर्व काही दिले, ती व्यक्ती या जगातील सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @creative_abhinandanyt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वडिलांना अशा पद्धतीने भेट दिल्याबद्दल अभिनंदनचे भरभरून कौतुक केले; तर अनेकांना स्वतःच्या पालकांच्या त्यागाची आठवण झाली. तर या व्हिडीओने लहानशा भेटवस्तूंमध्येही किती खोल भावना दडलेल्या असतात याची आठवण करून दिली. हा केवळ फोनचा विषय नव्हता, तर ज्या मुलाला एकेकाळी सर्व काही पुरवले त्या मुलाकडून अखेर एका पालकाला काहीतरी मिळाल्याचे सुख, समाधान काय असते हे सांगणारा व्हिडीओ होता आदी अनेक कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.
