Viral Video Son Surprise Parents With Car : कोणत्याही कुटुंबासाठी कार घेणं हे एक मोठं स्वप्न असतं. आणि जर ती पहिली कार असेल, तर आनंद आणखी वाढतो. कार आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करते, प्रवास सोपा करते. पण जर ती कार घरी सरप्राईज म्हणून आणली, तर तो क्षण आयुष्यात कायम लक्षात राहतो. आज एका व्यक्तीने आपल्या कुटुंबासाठी असंच खास सरप्राईज दिलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये लेकाने स्कुटी सांगून सगळ्यात महागडी गाडी दारात आणून उभी केली आहे…
सिद्धार्थ भदौरिया एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील क्षण शेअर करतो, त्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये आई-बाबांना सरप्राईज देण्याचा प्रसंग चित्रित केला आहे. त्याने वडिलांना केवळ स्कूटर भेट देणार असं सांगून नवी कोरी बीएमडब्ल्यू कार विकत आणून सरप्राईज दिले आहे. सरप्राईजवर आई-वडिलांची प्रतिक्रिया काय असेल, याबद्दल त्याला पूर्ण खात्री नव्हती. पण, आईची रिॲक्शन मात्र अगदी बघण्याजोगी होती.
“आईची रिॲक्शन सगळ्यात बेस्ट होती” (Viral Video)
लेक आई-वडिलांना पार्किंगमध्ये घेऊन येतो. तिथे एक स्कूटर छान सजवून ठेवलेली असते, जणू तीच भेट आहे असं वाटतं. आई हसतच गाडीची चावी वडिलांच्या हातात देते. वडील चावीचं बटण दाबतात… आणि अचानक त्या स्कूटरच्या मागे उभी असलेल्या ‘BMW’ कारची हेडलाईट लागते, दरवाजे आपोआप उघडतात! हे पाहून दोघेही पूर्ण गोंधळून जातात. काही क्षण त्यांना काय चाललंय तेच समजत नाही. ही कार खरंच आपली आहे का, असा त्यांना विश्वासच बसत नाही. पण जेव्हा सत्य लक्षात येतं, तेव्हा वातावरणच बदलून जातं.
व्हिडीओ नक्की बघा…
आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात, आणि वडीलही आश्चर्याने थक्क होऊन ती कार पाहतच राहतात. तो क्षण सगळ्यांसाठी खूप भावूक आणि आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो.त्यानंतर लेक त्यांना कारमध्ये बसून ती चालवून पाहण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @siddharthbhadauria या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “आईची रिॲक्शन सगळ्यात बेस्ट होती”, “गाडीची लाईट लागल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य… आणि बाबा स्कूटरकडेच पाहत होता, तीच सुरू का होत नाही असा विचार करततो क्षण खूपच भावूक होता” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
