Viral video: लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत.दरम्यान सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सासूनं लग्नामध्ये आपल्या सुनेला असं गिफ्ट दिलंय की सगळेच अवाक् झाले आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल प्रत्येक मुलीला असंच सासर मिळो.

सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

सासू-सून यांच्यातील नातेसंबंधांवर अनेक टीव्ही शोज आहेत, ज्यामध्ये त्यांच्यातील तू-तू-मैं-मैं बघायला मिळते. अनेक सासू आणि सूनेच्या नादात मज्जा कमी आणि वाद जास्त असतात. हे अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. अनेक सून सांगतात की सासू आपल्याला आपल्या मुलीसारखी का वागवत नाही. तर सून आपल्याशी आईसारखी वागणूक का देत नाही, अशी सासूची तक्रार असते. मात्र, काही घरांमध्ये सासू-सुनेचे नाते खूपच मस्त असते, याचे ताजे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हयरल झालेला एक व्हिडीओ.

आता तुम्ही म्हणाल सासूनं सुनेला असं काय गिफ्ट दिलंय? तर सासूबाईंनी होणाऱ्या सुनबाईंना लग्नात चक्क स्कोडा कार गिफ्ट केली आहे. यावेळी कारचं ओपनिंग करताना “सासूबाईंकडून सुनेला लग्नात सुनमुखनिमित्त खास सरप्राईज..” असं लिहलंदेखील आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Kuldeep Pawar (@kuldeeppawar79)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर @kuldeeppawar79 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.