Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमधील थरारक दृश्ये पाहून काळजाचा थरकाप उडतो. कधी प्राण्यांच्या मजेशीर हालचाली पाहायला मिळतात, तर कधी जंगलातील शिकारीचे किंवा जीवघेण्या संघर्षाचे प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालेले असतात. काही व्हिडीओ इतके थरारक असतात की, ते पाहताना पुढे नेमकं काय घडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचते. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आणि अनेकदा हे व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत या प्रसंगांबद्दल आश्चर्य व्यक्त करतात.

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अनेक घटना आपल्याला घरबसल्या पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अपघात, हाणामारी, वादविवाद, भांडणं, थरारक प्रसंग तसेच आश्चर्यचकित करणाऱ्या घटनांचाही समावेश असतो. काही व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमधील दृश्ये पाहून अंगावर काटा येतो. अनेकदा एखाद्या घटनेच्या वेळी उपस्थित असलेली व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये हा प्रसंग कैद करते आणि त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जातो. काही वेळातच असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जातात. त्यामुळे सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून जगभरातील घडामोडी घरबसल्या जाणून घेण्याचे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे.

‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. एखादी व्यक्ती मोठ्या संकटातून सुखरूप बचावते, तेव्हा ही म्हण आवर्जून बोलली जाते. असाच काहीसा थरारक प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती दुचाकीला टेकून बसलेली दिसते. ही व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये व्यग्र असते. त्याचवेळी अचानक एक कार वेगाने येते आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक देते. कारची धडक इतकी जोरदार असते की दुचाकी वेगाने पुढे जाते. मात्र, दुचाकीला अगदी खेटून बसलेली व्यक्ती या अपघातातून थोडक्यात बचावते. विशेष म्हणजे, एवढा मोठा प्रसंग घडूनही त्या व्यक्तीला कोणतीही दुखापत झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत नाही.हा व्हिडीओ दक्षिण भारतातला असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Polimer News (@polimernews)

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील @polimernews या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, “हे पाहून आश्चर्य करू की हसू?”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “त्याचे नशीब चांगले आहे.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, ‘बापरे खरंच लकी आहे हा…”