माकड हा तसा समजदार प्राणी आहे. देशभरात सर्रास आढळणारा प्राणी तुम्हाला कुठल्याही पर्यटन स्थळी दिसणारच. पण तिथे गेल्यानंतर प्राणी संग्रहालयात शांत बसलेल्या माकडांशी आपण उत्साहाच्या भरात चुकीचं वागतो. बरं माणसांप्रमाणेच एका ठराविक काळापर्यंतच कोणताही माकड तुमच्या हरकती सहन करतो. पण त्यानंतर जेव्हा त्याचा संयम तुटतो, तेव्हा माकडांच्या रागाचा सामनाही करावा लागतो. असाच एक प्रकार एका मुलीसोबत घडला. माकडाला डिवचण्याच्या नादात या व्हिडीओमधल्या मुलीला अशी अद्दल घडली आहे की ज्यामुळे ती पुन्हा कधी कुणाची खोड काढण्याचा विचार देखील करणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये माकड पिंजऱ्यात बंद असल्याचे दिसतं. हे माकड स्पायडर मंकी नावाने ओळखले जातात. ते लोखंडी जाळीजवळ शांत उभा आहे. दरम्यान एक मुलगी त्या माकडाजवळ जाते. बरं तिला एवढं जवळ उभा बघून माकडही भडकेलेला असतो. त्याची गुरगुर चालू असते. पण या अतरंगी मुलीने हातात मोबाईलही पडकलेला होता. बरं इथपर्यंत पण ठीक होतं. पण या माकडाच्या पिंजऱ्याच्या लोखंडी जाळीला फटके मारत शांत बसलेल्या माकडाला आणखी चिडवायची काय गरज होती? मग काय या माकडाचा राग अनावर झाला आणि मग पुढे त्याने जे केलं फारच मजेदार आहे. या माकडाने आपल्या पिंजऱ्याच्या जाळीतून हात बाहेर काढून त्या मुलीचे केसच पकडून ओढले. या प्रकारामुळे मुलगी इतकी घाबरली. की अक्षरश: ती आरडा-ओरडा करू लागली.

With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल
Parrot riding a bicycle
VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच

आणखी वाचा : बाबा रे! मॉलमध्ये मुलीने मुलाला लाथा-बुक्क्या आणि चपलीने धू-धू धुतलं, या मारहाणीचा VIDEO VIRAL

हे दृश्य पाहून एक मुलगा या मुलीच्या मदतीला येतो आणि स्पायडर मंकीच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न करतो. पण माकडाचा इतका राग अनावर झाला की तो या मुलीचे केस काही सोडायला तयार नव्हता. हे माकड आपली सगळी शक्ती एक करत जोरजोरात मुलीचे केस ओढू लागते. कसंबसं पुन्हा एक मुलगा तिथे येऊन माकडांना घाबरवून मुलीची सुटका करतो. पण तरी सुद्धा या मुलीची मस्ती काही संपत नाही. ती पुन्हा हातात मोबाईल घेऊन त्यांच्याजवळ फोटो काढण्यासाठी जाते. हे पाहून मग हे माकड आणखी चिडतं. यावेळी आणखी एक माकड तिल धडा शिकवण्यासाठी मदतीला येतं. मग हे दोन्ही माकड मिळून मुलीला आपल्या पिंजऱ्याच्या बाजूने जात असताना मोठ्या चतुराईने पुन्हा तिचे केस ओढतात. पण नशीब बलवत्तर म्हणून ही मुलगी पुन्हा त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी होते.

आणखी वाचा : रूबाब! वाघ रस्ता ओलांडत असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने सर्व गाड्या थांबवल्या; चंद्रपूरमधला VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : उंदीर आणि कबुतराची लढाई तुम्ही कधी पाहिलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ सुरुवातीला टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला. पण सोबतच हसू देखील आलं. हा व्हिडीओ कुठे रेकॉर्ड करण्यात आला हे अद्याप समजू शकलेले नाही. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया देत त्या मुलीची खिल्ली उडवली. या दोन्ही माकडांनी मुलीला जी अद्दल घडवली आहे ती पाहून आता यापुढे शांत बसलेल्या प्राण्याला कधी डिवचणार नाही, हे मात्र नक्की.