Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील व्हिडीओ चर्चेत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजन करणारे तर काही व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारे असतात. यातील मोजके व्हिडीओ क्षणार्धात प्रचंड व्हायरल होऊन लाखो व्ह्यूज मिळवतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यातील बाप्पाच्या आगमनापासून बाप्पाच्या विसर्जनापर्यंत अनेक गोष्टी चर्चेत आल्या. दरम्यान, आतादेखील एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक आजी असं काहीतरी करतायत जे पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.

व्यक्ती वयाने लहान असो किंवा वृद्ध, लहान-लहान गोष्टींमध्ये प्रत्येकाचा आनंद दडलेला असतो. आयुष्यातील दुःखाला बाजूला सारून चेहऱ्यावर हास्य ठेवणं आताच्या पिढीसाठी खूप कठीण आहे. पण, पूर्वीच्या लोकांसाठी या गोष्टी सहज शक्य आहेत. सोशल मीडियावर विविध वयोगटातील लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यात एक आजी खिडकीत उभं राहून असं काहीतरी करत आहेत जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर गोड हसू येईल.

Pune shop owner advertise for Renting shop in Puneri way puneri poster goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गाळा भाड्यानं देण्यासाठी दुकानाबाहेर लावली जाहिरात; वाचून पोट धरुन हसाल
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
Viral Reel Shows Child Hanging As Mother Holds Her With One Hand While Posing Sitting On Well's Fence video
“अगं आई ना तू?”, रीलसाठी महिलेनं पोटच्या लेकराला मृत्यूच्या दारात नेलं; VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Teacher running towards classroom to resolve fight students gave surprise viral video
विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री, सलमान खानला हसू झालं अनावर, घरात राहणार गाढवाबरोबर! पाहा प्रोमो
The lion came with the speed of the wind and attacked the cheetah
जगण्यासाठी शिकार महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला सिंह अन् केला चित्यावर हल्ला; पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Mumbai: Leopard Spotted Rolling & Relaxing In Bushes Of Aarey Milk Colony
VIDEO: मुंबईतील ‘आरे’मध्ये दिसला बिबट्या अन्…; मध्यरात्री बिबट्या रस्त्याच्या कडेला काय करत होता पाहा
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

काय घडलं व्हिडीओमध्ये?

नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सव म्हटलं की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. हा व्हायरल व्हिडीओ गणपती आगमनादरम्यानचा असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजी त्यांच्या घराच्या खिडकीतून इमारतीखाली सुरू असलेला आगमन सोहळा पाहत आहेत. यावेळी खालील काही लोक आजींकडे पाहून नाचत आहेत, जे पाहून आजीदेखील खिडकीत उभं राहून सुंदर डान्स करतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी लक्ष वेधून घेतलं. आजींचा हा हसरा गोड चेहरा पाहून नेटकरीही त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. शिवाय आजींबरोबर समोर उभी असलेली त्यांची नातदेखील छान तयार झाली आहे. यावेळी आजी नातीला खाली जाऊन नाचण्यासाठी सांगत असल्याचे दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “वय हा केवळ एक आकडा आहे” असं लिहिलं आहे.

हेही वाचा: किली पॉलचा ‘यिम्मी यिम्मी’ गाण्यावर जबरदस्त डान्स अन् हटके एक्स्प्रेशन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “भाऊ एकदम..”

पाहा व्हिडीओ:

हा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @hitesh_khache या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि एक लाख लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “जोपर्यंत मराठी माणूस आहे, तोपर्यंतच मुंबई आहे, इथली संस्कृती आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मध्यमवर्गीय माणूस नेहमीच गणेशोत्सव खूप जवळून साजरा करतो”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आजी खूप खूप प्रेम”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “मन कधीही म्हातारे होत नाही.”