काही लोकांचा आवाज इतका छान असतो की तो कानातून थेट मनात जातो. मोठा स्टेज, माईक किंवा लाईट्स नसले तरी फक्त आवाजामुळे लोक थांबून ऐकतात. आजकाल सोशल मीडियामुळे असे अनेक टॅलेंट समोर येत आहेत, जे कुठल्याही मोठ्या संधीची वाट न पाहता स्वतःचं कौशल्य दाखवत आहेत. असाच एक साधा पण मनाला भिडणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका विद्यार्थ्याने वर्गामध्ये गायलेलं गाणं लोकांना इतकं आवडलं की लाखो लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आणि त्याचं भरभरून कौतुक केलं.

हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील किंवा कॉलेजमधील क्लासरूममधला आहे. इन्स्टाग्रामवर rishabhsinghmusic_ या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांचं गाणं गाताना दिसतो. विशेष म्हणजे कोणताही कार्यक्रम नाही, स्पर्धा नाही, फक्त रोजचा वर्ग आणि त्यामध्ये उमटलेली एक सुरेल आवाजाची झलक हाच या व्हिडीओचा खास भाग आहे.

व्हिडीओची सुरुवात एका साध्या वर्गामधून होते. वर्गात विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या बाकांवर बसलेले दिसतात आणि शिक्षकही शांतपणे खुर्चीवर बसलेले आहेत. अशाच वातावरणात एक विद्यार्थी वर्गात उभा राहतो आणि ‘कलंक’ चित्रपटातील टायटल साँग गाण्यास सुरुवात करतो. हे गाणं मुळात अरिजीत सिंह यांनी गायलेलं असून ते भावनिक आणि अवघड मानलं जातं.

विद्यार्थ्याचा आवाज मात्र इतका स्वच्छ, भावपूर्ण आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे की संपूर्ण वर्ग शांत होतो. काही विद्यार्थी त्याचं गाणं तन्मयतेने ऐकत राहतात, तर काही जण मोबाईलमध्ये हा क्षण कैद करताना दिसतात. क्लासरूममधला नेहमीचा गोंगाट नाहीसा होतो आणि संपूर्ण वातावरण आनंदी बनतं. हा व्हिडीओ पाहताना असं वाटतं की, खऱ्या अर्थाने टॅलेंट कुठेही चमकू शकतं.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओला आतापर्यंत ७ लाख ९० हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले असून ६५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. प्रतिक्रियांमध्ये नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे, “तुझा आवाज खूप क्यूट आहेत.” तर दुसऱ्याने म्हटलं, “खूप पुढे जाशील भावा, मेहनत चालू ठेव.”

एकाने प्रतिक्रिया देत लिहिलं, “हा आवाज थेट काळजात भिडतो.” अनेकांनी असंही म्हटलं की, अशा टॅलेंटला योग्य व्यासपीठ आणि योग्य मार्गदर्शन मिळायला हवं.