Funny Answer Sheet: परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात महत्वाचा भाग असतो. या परीक्षेत विद्यार्थी अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नांना चमत्कारीक उत्तर देत असतात. सध्या सोशल मीडियावर एका उत्तर पुत्रिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही उत्तर पत्रिका वाचून तुम्हालाही धक्का बसणार आहे. तुम्हाला हासावे की खेद व्यक्त करावा, हे समजणार नाही. या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत असा काही डायलॉग लिहिला की शिक्षक ही चकीत झाले आहेत.
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या मजेदार उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. ज्यात विद्यार्थी असं काही लिहितात, ज्याबाबत कुणी कल्पनाही केलेली नसते. अशीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. ज्यात असं काही लिहलंय की, जे वाचून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शिक्षक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासत आहे. ते व्हिडिओ करणाऱ्याला जवळ बोलवून उत्तरपत्रिकेवर फोकस करायला सांगतात. ते म्हणतात, “या विद्यार्थ्याने पहिल्या पान उघडले तर त्यावर लिहिले होते, “माझी उत्तरपत्रिका गुरूंच्या दारात पोहोचली आहे. कृपया तिला ३३ गुण देऊन उत्तीर्ण करा. जय बजरंग बली.” दुसऱ्या पानावर लिहिले होते, “माझी रथगाडी, माझा घोडा, कृपया मलाही उत्तीर्ण करा.”
आपल्याला उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने पुढच्या पानावर लिहले होते, “मी फ्री फायरमध्ये एकापाठोपाठ एक हेडशॉट मारले, त्यामुळेच परीक्षेतील सर्व पाने कोरी आहेत.” याचाच अर्थ की अभ्यासाचा सर्व वेळ त्याने गेम खेळण्यात घालवला ज्यामुळे त्याला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे लिहिता आली नाही. खोडकर विद्यार्थी फक्त इथेच थांबला नाही तर पुढच्या पानावर त्याने लिहिले की, “ती मला एका अनोळखी व्यक्तीसाठी सोडून गेली, मी एकेकाळी जगातला टॉपर होतो. नेहा, बाबू, कृपया परत ये.”
या सर्व पानांनंतर शेवटचे पान उघडण्यात आले ज्याला पाहून शिक्षकांनाही धक्का बसला. यावर “कृपया, कृपया, कृपया” असे लिहून विद्यार्थ्याने काही नोटा लावून ठेवल्या होत्या. शिक्षकाने या नोटा मोजताच ती एकूण २,१०० रुपयांची रक्कम असल्याचे समजले. म्हणजेच शायरींनंतर विद्यार्थ्याने पास होण्यासासाठी अखेर शिक्षकांसाठी पैशांची लाच देखील ठेवली होती.
‘सर, मला पास करा, मला पेपर अवघड गेला आहे, आपण पेपर तपासताना मला जास्त गुण देवून पास करा, आणि तुमचा गुगल पे किंवा फोन पे नंबर द्या, मी तुम्हाला पैसे पाठवतो. उत्तरपत्रिकांमध्ये असे मथळे लिहिलेले पाहून शिक्षकही अचंबित झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nocturnal_bird_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ही पोस्ट हजारो जणांनी पाहिली असून त्याला लाइक केले आहे. त्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंट आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, भविष्यातील आयएएस अधिकारी. दुसरा म्हणतो, असे कितीतरी विद्यार्थ्यांकडून यांनी लाच घेतली असेल.
