Dance Viral Video: समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली बॉलीवूडमधील एकेकाळी गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोकं मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. अनेकदा नवनवीन गाण्यांसह जुन्या चित्रपटांतील गाणीही खूप चर्चेत येतात. मागील काही महिन्यांपासून बॉलीवूडमधील ‘अरे होगा तुमसे प्यारा कौन’ हे गाणं खूप चर्चेत आहे. या व्हिडीओतील चिमुकली याच गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भारतीय चिमुकली परदेशातील रस्त्यावर ‘अरे होगा तुमसे प्यारा कौन’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकली करत असलेल्या डान्समधील स्टेप्स एकापेक्षा एक असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षवेधी आहेत. चिमुकलीचा डान्स पाहून नेटकरी व्हिडीओवर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘गरिबी माणसाला जगणं शिकवते…’ भरपावसात आजींनी असं काही केलं; VIDEO पाहून नेटकरीही झाले भावूक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘डान्स असावा तर असा’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘गोंडस परी आहे ही’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘असा डान्स मी कधीच पाहिला नाही’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खूपचं क्यूट.’