Swimming Pool Dandiya Viral Video: नवरात्रीचे शेवटचे काही दिवस शिल्लक असताना आता गरबा व दांडियासाठी तुफान गर्दी होत आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडियाच्या कार्क्रमात आपण सगळ्यात हटके दिसावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, भन्नाट स्टाईलचे चनिया चोळी, केडीयू,दागिने , टॅटू आणि कितीतरी पद्धतीने हौशी कलाकार प्रयत्न करत असतात. अशाच हटके मंडळींनी अलीकडे चक्क स्विमिंग पूलमध्ये उतरून दांडिया रासची मजा अनुभवली आहे.

गुजरातच्या सुरतमधील हा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपण पाहू शकता की यामध्ये अनेक महिला, तरुणी, पुरुष व लहान मुलेही स्विमिंग पूलमध्ये उतरून ढिनच्यॅक बिट्सवर दांडिया खेळत आहेत.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

स्विमिंग पूलमध्ये रंगला दांडिया

यापूर्वी ही नवरात्रीच्या आधी स्विमिंग पूलमधील गरब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे स्विमिंग पूलमध्ये उतरून एक गट गरबा खेळताना दिसत आहे. पारंपरिक चनिया चोळी व केडीयू घालून यात महिला व पुरुष दोघेही भन्नाट स्टेप करताना पाहायला मिळाले होते.

Video: श्रीकांत शिंदेंच्या गरब्याला आले जॅकी श्रॉफ; स्टेजवर असं काही केलं की डोंबिवलीकर बघतच राहिले

यंदा २६ सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. मागील दोन वर्षात न अनुभवलेला नवरात्रीचा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक गरबा व दांडिया प्रेमींनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. सेलिब्रिटी व राजकीय मंडळीही या गरब्याच्या तालावर थिरकताना दिसली होती.

तुम्हीही गरब्याची मनसोक्त मजा लुटली असेलच हो ना? तुमचे दांडियाचे फोटो लोकसत्ता वर पाहायची इच्छा असेल तर आमच्या पेजवरील लोक उत्सव या विभागाला आवर्जून भेट द्या .