viral video teacher surprise farewell for students : महाविद्यालय असो किंवा शाळा; पहिला आणि शेवटचा असे दोन्ही दिवस आपल्यासाठी खूपच जवळचे असतात. कारण- या दोन्ही दिवसांना पार केल्यानंतर एक वेगळेच जग आपली वाट पाहत असते. त्यामुळे शेवटचा दिवस खास करण्यासाठी फेअरवेल, सॅण्ड ऑफ असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या दिवशी विद्यार्थी त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतात, ज्यांनी या प्रवासात त्यांना कळत-नकळत भरपूर मदत केलेली असते. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
शिक्षकाने अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे; जे पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात आधी शिक्षकाने संपूर्ण वर्ग सजवला आहे. फुलांचा वर्षाव करून प्रत्येक विद्यार्थ्याला पेन भेटवस्तू म्हणून दिल्या आहेत. त्यानंतर त्यांना टिक्का लावून, जेवणाचे सुद्धा आयोजन केले आहे. त्यानंतर काही मोजक्या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सल्ले सुद्धा दिले. एवढेच नाही तर शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःहून या गोष्टी करताना दिसत आहेत आणि विद्यार्थी शिक्षकाचे प्रेम पाहून ढसाढसा रडताना दिसत आहेत
असे शिक्षक सगळ्यांना मिळो (Viral Video)
तुम्ही पाहू शकता शिक्षकाने टप्प्याटप्प्याने या निरोप समारंभाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रत्येक व्हिडीओत शिक्षकाचे विद्यार्थ्यांप्रती प्रेम दिसत आहेत. कोण सन्मानाने शिक्षकाच्या पाया पडत आहेत. तर कोण त्यांना मिठी मारून रडताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी सुद्धा एकमेकांपासून लांब जाणार या दुःखात एकमेकांना मिठी मारून रडताना दिसत आहेत. एकदा बघाच सोशल मीडियावर शिक्षकाने शेअर केलेले निरोप समारंभाचे काही खास फोटोज आणि व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @r_y_s_classes या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत, तर काही जण भावूक होताना दिसत आहेत. एवढेच नाही तर हा व्हिडीओ अगदी हृदयाला भिडला असे देखील म्हणत आहेत आणि असे शिक्षक सगळ्यांना मिळो अशी प्रार्थना देखील करताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत आणि व्हिडीओ टप्याटप्प्याने बघण्यासाठी या अकाउंटवर आवर्जून येताना दिसत आहेत…

